पॅरिस ऑलिम्पिक : अमेरिका, चीन यांचेच राहणार वर्चस्व; अधिकाधिक पदके जिंकण्याची शक्यता  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 07:29 AM2024-04-18T07:29:35+5:302024-04-18T07:30:32+5:30

अमेरिका ३९ सुवर्णपदकांसह एकूण १२३ पदके जिंकण्याचा अंदाज आहे.

Paris Olympics America, China will dominate Chances of winning more medals | पॅरिस ऑलिम्पिक : अमेरिका, चीन यांचेच राहणार वर्चस्व; अधिकाधिक पदके जिंकण्याची शक्यता  

पॅरिस ऑलिम्पिक : अमेरिका, चीन यांचेच राहणार वर्चस्व; अधिकाधिक पदके जिंकण्याची शक्यता  

पॅरिस : पुढील १०० दिवसांत सुरू होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक आणि एकूण पदक संख्येच्या बाबतीत अमेरिका, चीन हे दोन देश पहिल्या दोन क्रमांकांवर राहण्याची शक्यता आहे. अमेरिका ३९ सुवर्णपदकांसह एकूण १२३ पदके जिंकण्याचा अंदाज आहे. चीन ३५ सुवर्णपदकांसह ८९ पदके जिंकण्याची शक्यता आहे. तीन वर्षांपूर्वी कोरोना महामारीमुळे विलंब झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्येही हे दोन देश पदकांच्या बाबतीत पहिल्या दोन क्रमांकांवर होते.  
   
जगभरातील क्रीडा लीगसाठी सांख्यिकीय विश्लेषण करणाऱ्या निल्सनच्या ग्रेसनोट स्पोर्ट्सने हा अंदाज वर्तविला आहे. खेळांबरोबरच ऑलिम्पिक खेळांशी संबंधित प्रमुख कार्यक्रमांवरही ते लक्ष ठेवतात. ग्रेसनोटची क्रमवारी जिंकलेल्या एकूण पदकांवर आधारित असते, तर इतर क्रमवारी एकूण सुवर्णपदकांवर आधारित असते. 

उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेने एकूण सर्वाधिक पदके जिंकण्याचा अंदाज वर्तविला जाण्याची ही सलग आठवी वेळ आहे. बार्सिलोनामध्ये १९९२ मध्ये युनिफाइड संघ पदक संख्येच्या बाबतीत अव्वल स्थानी होता. ते खेळाडू पूर्वीच्या सोव्हिएत युनियनचे होते. ते नंतर एक सार्वभौम राज्य म्हणून वेगळे झाले. अमेरिका ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकांच्या बाबतीत २००८ बीजिंग ऑलिम्पिकमध्ये अव्वल स्थानी नव्हता. तेव्हा चीनने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती आणि त्याचे फायदेही दिसत होते. 

‘आतापासून प्रत्येक सराव सत्र महत्त्वाचे’
‘पॅरिस ऑलिम्पिकसाठी केवळ १०० दिवस राहिले आहेत. अशावेळी आमच्यासाठी प्रत्येक दिवस, प्रत्येक सराव शिबिर, सत्र महत्त्वाचे आहे,’ असे भारतीय पुरुष हाॅकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग याने म्हटले. टोकियो ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेता भारतीय संघ जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी आहे. हरमनप्रीत म्हणाला की, ‘ऑस्ट्रेलियाच्या कठीण दौऱ्यावरून आम्ही परतलो आहोत. ऑलिम्पिकसाठी १०० दिवस राहिल्याने संघाचा उत्साह वाढला आहे. सुवर्ण लक्ष्य ठेवूनच आम्ही खेळू.’

Web Title: Paris Olympics America, China will dominate Chances of winning more medals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Parisपॅरिस