Paris Olympics Day 8 Schedule: मनू भाकर इतिहास घडवणार, तिसरं पदक जिंकणार? जाणून घ्या भारतीय खेळाडूंचे वेळापत्रक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 08:13 AM2024-08-03T08:13:32+5:302024-08-03T08:13:58+5:30
Paris Olympics Day 8 Schedule: मनू भाकरने काल चमकदार खेळी करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे, यामुळे आता आणखी एका पदकाची संधी आहे.
Paris Olympics Day 8 Schedule: पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील आज आठवा दिवस आहे, भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. आतापर्यंत भारतीय खेळाडूंनी ३ पदके मिळवली आहेत. मनू भाकरने काल जोरदार खेळी करत फायनलमध्ये पोहोचली आहे. यामुळे आता आणखी एका पदकाची भारताला संधी आहे.
मनू भाकरने काल पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे, तिने सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धेत पदके जिंकली आहेत. आज मनू भाकर २५ मीटर महिला पिस्तुल नेमबाजी स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणार आहे. हा सामना दुपारी १ पासून सुरू होणार आहे. जर मनूने या स्पर्धेत पदक जिंकले तर ती भारताची महान खेळाडू बनेल, कारण कोणत्याही भारतीय खेळाडूने आतापर्यंत ३ वैयक्तिक पदके जिंकलेली नाहीत.
मनू भाकर आता पदकांची हॅटट्रिक करण्याच्या तयारीत आहे.मनू भाकर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एक हुशार खेळाडू म्हणून उदयास आली आहे. एकापाठोपाठ एक दोन पदके जिंकून तिने रेकॉर्ड केले आहे. वैयक्तिक १० मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर सरबज्योत सिंगसह मनू भाकरने मिश्र सांघिक प्रकारातही कांस्यपदक जिंकले. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली आहे. या ऑलिम्पिकमध्ये भारताची तिन्ही पदके नेमबाजीतच आली आहेत. आज भारतीय खेळाडू पाच प्रकारात खेळणार आहेत.
भारतीय खेळाडूंचे आजचे वेळापत्रक
नेमबाजी
महिला २५ मीटर पिस्तुल फायनल (दुपारी १ वाजता) मनू भाकर
महिला स्किट पात्रता (दिवस १): रीझा ढिल्लॉन आणि माहेश्वरी चौहान: दुपारी १२.३०
गोल्फ
पुरुष फेरी ३ - शुभंकर शर्मा, गगनजीत भुल्लर - १२.३० वाजता.
तिरंदाजी
महिला वैयक्तिक (१/८ एलिमिनेशन): दीपिका कुमारी विरुद्ध मिशेल क्रॉपेन (जर्मनी) दुपारी १.५२ वाजता.
महिला वैयक्तिक (१/८ एलिमिनेशन): भजन कौर विरुद्ध डियांडा चोइरुनिसा (इंडोनेशिया), दुपारी २.०५ वाजता
महिला वैयक्तिक (क्वार्टरफायनल) – दीपिका कुमारी/भजन कौर: दुपारी ४.३०
महिला वैयक्तिक उपांत्य फेरी (पात्र ठरल्यास) – दीपिका कुमारी/भजन कौर: संध्याकाळी ५.२२ महिला वैयक्तिक कांस्यपदक सामना (उपांत्य फेरीत हरल्यास) – दीपिका कुमारी/भजन कौर: संध्याकाळी ६.०३ वाजता
महिलांचा वैयक्तिक सुवर्णपदक सामना (जर पात्र ठरला तर) – दीपिका कुमारी/भजन कौर: संध्याकाळी ६.१६
सेलिंग
महिला डिंघी (शर्यत पाच): नेत्रा कुमनन - सायंकाळी ५.५५
महिला डिंघी (शर्यत सहा): नेत्रा कुमनन - ७.०३ वाजता
पुरुष डिंघी (शर्यत पाच): विष्णू सरवणन - ३.४५ वाजता
बॉक्सिंग
पुरुष ७१ किलो वजनी गट क्वार्टर फायनल (मध्यरात्री १२.१८ वाजता ) निशांत देव