मोठी बातमी! विनेश फोगटला रौप्य पदक नाहीच; क्रीडा लवादानं फेटाळले अपील

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 09:30 PM2024-08-14T21:30:08+5:302024-08-14T21:48:38+5:30

Vinesh Phogat : ऑलिम्पिकमध्ये क्रीडा लवादानं अपील फेटाळल्यामुळे विनेश फोगटला रौप्य पदक मिळणार नाही

Paris olympics wrestler Vinesh Phogat will not get any medal petition rejected in CAS says Sources | मोठी बातमी! विनेश फोगटला रौप्य पदक नाहीच; क्रीडा लवादानं फेटाळले अपील

मोठी बातमी! विनेश फोगटला रौप्य पदक नाहीच; क्रीडा लवादानं फेटाळले अपील

Paris olympics 2024 :पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय चाहत्यांना दुसरा मोठा धक्का बसला आहे. कुस्तीपटूविनेश फोगट हिने रौप्य पदकासाठी कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्स मध्ये दावा दाखल केला होता. त्याची सुनावणी झाली आहे, पण निकाल देण्याची तारीख सतत पुढे ढकलली जात होती. मात्र आता या प्रकरणाचा निर्णय आला आहे. सीएएसने विनेशचे अपील फेटाळले आहे.त्यामुळे आता त्याला रौप्य पदक मिळणार नाही.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगटचे १०० ग्रॅम वजन जास्त असल्यामुळे महिलांच्या ५० किलो फ्रीस्टाइल स्पर्धेच्या अंतिम फेरीतून अपात्र ठरवण्यात आलं होतं. त्यानंतर केलेल्या अपीलात कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टने विनेशला अपात्र ठरवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. यापूर्वी या प्रकरणाचा निर्णय १३ ऑगस्टला दिला जाणार होता. मात्र निर्णयाची तारीख १६ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आल्याची बातमी समोर आली होती. मात्र आता त्यापूर्वीच हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. क्रीडा लवादाने विनेश फोगट प्रकरण फेटाळून लावले आहे. 

भारतीय ऑलिम्पिक समितीने या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षा पीटी उषा यांनी कुस्तीपटू विनेश फोगटच्या प्रकरणात युनायटेड वर्ल्ड रेसलिंग विरुद्ध तक्रार दाखल करण्याची विनंती कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टच्या एकमेव लवादाकडे केली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने अर्ज फेटाळण्याच्या निर्णयावरही पीटी उषा यांनी आश्चर्य आणि निराशा व्यक्त केली आहे. 

पॅरिस ऑलिम्पिक विनेशने ६ ऑगस्ट रोजी सलग ३ सामने खेळून ५० किलो फ्रीस्टाइल कुस्तीच्या अंतिम फेरीत प्रवेश करून रौप्य पदकावर दावा ठोकला होता. सुवर्णपदकाचा सामना ७ ऑगस्टच्या रात्री होणार होता. पण त्याच दिवशी सकाळी विनेशला अपात्र ठरवण्यात आले कारण सामन्यापूर्वी तिचे वजन १०० ग्रॅम जास्त होते. यानंतर विनेशने सीएएसमध्ये अपील केले होते. सुवर्णपदकाचा सामना खेळण्याची परवानगी द्यावी, ही तिची पहिली मागणी होती. मात्र नियमांचा हवाला देत ही मागणी तात्काळ फेटाळण्यात आली. यानंतर विनेशने तिला या स्पर्धेत रौप्य पदक मिळवून द्यावे, असे सांगितले. मात्र आता हे अपीलही फेटाळण्यात आले आहे.

Web Title: Paris olympics wrestler Vinesh Phogat will not get any medal petition rejected in CAS says Sources

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.