Paris Paralympics 2024 : मैदानी खेळात एका पाठोपाठ ५ मेडल्स; पॅरिसमध्ये भारतानं रचला इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 02:34 AM2024-09-04T02:34:06+5:302024-09-04T02:42:03+5:30

सहाव्या दिवशी रात्री उशिराने कमावलेल्या ५ पदकासह पॅरालिम्पिकच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक पदकं मिळवण्याचा महा विक्रम भारताच्या नावे झाला आहे.  

Paris Paralympics 2024 Ajeet and Sundar win silver and bronze in javelin throw F46 India Records Best Ever Medal Haul Single Edition Past Tokyo Mark | Paris Paralympics 2024 : मैदानी खेळात एका पाठोपाठ ५ मेडल्स; पॅरिसमध्ये भारतानं रचला इतिहास

Paris Paralympics 2024 : मैदानी खेळात एका पाठोपाठ ५ मेडल्स; पॅरिसमध्ये भारतानं रचला इतिहास

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेच्या सहाव्या दिवशी दिवसभरात भारतीय खेळाडूंना अपेक्षित कामगिरी बजावता आली नाही. पण रात्री उशीरा सुरु झालेल्या मैदानी खेळात भारतीय खेळाडूंनी दिमाखदार कामगिरीसह ५ पदकं भारताच्या खात्यात जमा केली. या पदकासह भारताने पॅरालिम्पिक स्पर्धेच्या एका हंगामात सर्वाधिक पदकं कमावण्याचा विक्रम रचला आहे.

पॅरालिम्पिकच्या आतापर्यंतच्या इतिहासात घडलं नाही ते चित्र पाहायला मिळालं 

पॅरालिम्पिकच्या आतापर्यंतच्या इतिहासात टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने सर्वाधिक १९ पदकांची कमाई केली होती. आता सातव्या दिवसाच्या सुरुवातीआधी भारताच्या खात्यात २० पदकं जमा आहेत. 

सहाव्या दिवशी रात्री उशीरा मैदानी खेळातून आली ५ पदकं

सहाव्या दिवशी मैदानी खेळातून दीप्ती जीवनजी हिने कांस्य पदकासह भारताच्या पदकाची सुरुवात केली होती. त्यानंतर उंच उडी आणि भालाफेक प्रकारात प्रत्येकी दोन-दोन पदकं भारताच्या खात्यात जमा झाली.  सहाव्या दिवशी रात्री उशीरा कमावलेल्या ५ पदकासह पॅरालिम्पिकच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक पदकं मिळवण्याचा महा विक्रम भारताच्या नावे झाला आहे.  

भालाफेक F46 प्रकारातही दोघांची पदकाला गवसणी

उंच उडीशिवाय भालाफेक F46 प्रकारात अजीत सिंह याने ६५.६२ मीटर अंतरावर भाला फेकून रौप्य पदकावर कब्जा केला. दुसरीकडे याच गटात  सुंदरसिंह गुर्जर याने  ६४.९६ मीटर भालाफेकीसह कांस्य पदक पटकावले. पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने ३ सुवर्ण, ७ रौप्य आणि १० कांस्य पदकांसह एकूण २० पदकांची कमाई केली आहे. हा आकडा सरशेवटी आणखी वाढेल, अशी अपेक्षा आहे. पदकतालिकेत भारत १७ व्या स्थानावर आहे.

Web Title: Paris Paralympics 2024 Ajeet and Sundar win silver and bronze in javelin throw F46 India Records Best Ever Medal Haul Single Edition Past Tokyo Mark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.