Paris Paralympics 2024 Day 3: तिसऱ्या दिवशी भारताच्या खात्यात किती पदकं येणार? कुणाला आहे पोडिअम फिनिशची संधी?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 10:15 AM2024-08-31T10:15:01+5:302024-08-31T10:22:41+5:30
तिसऱ्या दिवशी वेगवेगळ्या इवेंटमध्ये भारतीय खेळाडूंना पोडियम फिनिश करण्याची संधी असेल.
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेतील दुसऱ्या दिवशी भारतीय खेळाडूंनी चार पदकांची कमाई केली. यात १ सुवर्ण, १ रौप्य आणि २ कांस्य पदकांचा समावेश आहे. तिसऱ्या दिवशी पुन्हा भारतीय खेळाडूंकडून सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा आहे. वेगवेगळ्या इवेंटमध्ये भारतीय खेळाडूंना पोडियम फिनिश करण्याची संधी असेल. एक नजर भारतीय खेळाडूंच्या तिसऱ्या दिवशीच्या वेळापत्रकावर
पॅरा बॅडमिंटन
- दुपारी १२ : ०० नंतर-: महिला एकेरी SL3 ग्रुप प्ले स्टेज-मनदीप कौर (भारत) विरुद्ध सेलीन विनोत (ऑस्ट्रेलिया)
पॅरा शूटिंग/ नेमबाजी
- दुपारी ०१ : ०० -: पुरुष गटातील १० मीटर रायफल स्टँडिंग SH1-पात्रता फेरी-स्वरुप उन्हाळकर
पॅरा बॅडमिंटन
- दुपारी ०१ : २० नंतर -: पुरुष एकेरी SL3 ग्रुप प्ले स्टेज- नितेश कुमार (भारत) विरुद्ध मोंगखोन बुन्सु (थायलंड)
पॅरा सायकलिंग ट्रॅक
- दुपारी ०१ : २०-:महिला गटातील C1-3 ५०० मीटर पात्रता फेऱी-ज्योती गडेरिया
- दुपारी ०१ : ४९ -: पुरुष गटातील C1-3 १००० मीटर पात्रता फेरी- अर्शद शेख
पॅरा बॅडमिंटन
- दुपारी ०२ : ०० -: पुरुष एकेरी SL3 ग्रुप प्ले स्टेज -मनोज सरकार (भारत) विरुद्ध यंग ज्यान्युआन (चीन)
- दुपारी ०२ : ४० -: पुरुष एकेरी SL4 ग्रुप प्ले स्टेज- सुकांत कदम (भारत) विरुद्ध सिरिपोंग टीमारोम (थायलंड)
पॅरा रोइंग
- दुपारी ०२ : ४०-: PR3 मिश्र दुहेरी स्कल्स रेपेचेज- अनिता/नारायणा कोंगनपल्ले
पॅरा बॅडमिंटन
- दुपारी ०२ : ४०-: पुरुष एकेरी SL4 ग्रुप प्ले स्टेज -तरुण (भारत) विरुद्ध लुकास माझुर(फ्रान्स )
पॅरा शूटिंग/नेमबाजी
- दुपारी ०३ : ३०-: महिला १० मीटर एअर पिस्तूल SH1 पात्रता फेरी- रुबिना फ्रान्सिस
- दुपारी ०३ : ४५-: पुरुष गटातील १० मीटर रायफल स्टँडिंग SH1-अंतिम फेरी-स्वरुप उन्हाळकर (जर तो पात्र ठरला तर)*
पॅरा बॅडमिंटन
- दुपारी ०४:००-: महिला एकेरी SU5 ग्रुप प्ले स्टेज- मनिषा रामदास (भारत) विरुद्ध यांग क्विक्सिया (चीन)
पॅरा सायकलिंग ट्रॅक
- सायंकाळी ०५ :१०-: महिला C1-3 ५०० मीटर मेडल इवेंट-ज्योती गडेरिया ( जर ती पात्र ठरली तर)
- सायंकाळी ०५ :३७-: पुरुष C1-3 १००० मीटर C2 मेडल इवेंट- अर्शद शेख (जर तो पात्र ठरला तर)*
पॅरा शूटिंग/नेमबाजी
- सायंकाळी ०६ :१५-: महिला १० मीटर एअर पिस्तूल SH1 अंतिम फेरी मेडल इवेंट- रुबिना फ्रान्सिस (जर ती पात्र ठरली तर)*
पॅरा आर्चरी/तिरंदाजी
- सायंकाळी ०७ :००-: महिला वैयक्तिक कंपाउंड ओपन राउंड ८ - सरिता कुमारी (भारत) विरुद्ध एलेओनोर सार्टी
- सायंकाळी ०७ :००-: महिला वैयक्तिक कंपाउंड ओपन राउंड ८ -शीतल देवी (भारत) विरुद्ध मरियाना झुनिगा (चिली)
- रात्री ०९ :३३-: महिला वैयक्तिक कंपाउंड ओपन उप उपांत्यपूर्व फेरी-सरिता कुमारी (जर पात्र ठरली तर)*
- रात्री १० :०७-: महिला वैयक्तिक कंपाउंड ओपन उपांत्यपूर्व फेरी-सरिता कुमारी (जर पात्र ठरली तर)*
पॅरा अॅथलिट्स
- रात्री १० :०७-: पुरुष भालाफेक, F57 अंतिम फेरी प्रवीण कुमार