Paris Paralympics 2024: भारताचा 'डबल धमाका'! क्लब थ्रोमध्ये धरमबीरला सुवर्ण, प्रणव सुरमाला रौप्य; एकूण पदके किती?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 09:21 AM2024-09-05T09:21:43+5:302024-09-05T09:21:43+5:30

Paris Paralympics 2024: धरमबीरने ३४.९२ मीटरची तर प्रवीण सुरमाची ३४.१८ मीटरची सर्वोत्तम फेक

Paris Paralympics 2024 Day 7 Dharambir and Pranav Soorma bag gold and silver respectively in Mens Club Throw | Paris Paralympics 2024: भारताचा 'डबल धमाका'! क्लब थ्रोमध्ये धरमबीरला सुवर्ण, प्रणव सुरमाला रौप्य; एकूण पदके किती?

Paris Paralympics 2024: भारताचा 'डबल धमाका'! क्लब थ्रोमध्ये धरमबीरला सुवर्ण, प्रणव सुरमाला रौप्य; एकूण पदके किती?

Paris Paralympics 2024: पॅरिस पॅरालिम्पिक २०२४च्या सातव्या दिवशी भारतीय खेळाडूंने दमदार कामगिरी केली. धर्मबीरने चमकदार कामगिरी करत मेन्स क्लब थ्रो (F51) मध्ये सुवर्णपदक जिंकले. धरमबीरने चौथ्या प्रयत्नात ३४.९२ मीटरची सर्वोत्तम फेक केली. या स्पर्धेत भारताच्या प्रणव सुरमाला रौप्य पदक जिंकण्यात यश आले. प्रणवने पहिल्याच प्रयत्नात सर्वोत्तम ३४.५९ मीटर फेक केली. सर्बियाचा झेलफो दिमित्रीजेविक कांस्यपदक जिंकण्यात यशस्वी ठरला. त्याचा सर्वोत्तम थ्रो ३४.१८ मीटर इतका होता.

याच स्पर्धेत भारताच्या अमित कुमार सरोहा याला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. तो दहाव्या क्रमांकावर राहिला. त्याने २३.९६ मीटरची सर्वोत्तम फेक केली. सध्या सुरू असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताचे हे पाचवे सुवर्णपदक आहे. या दोन पदकांसह भारताच्या पदकांची संख्या आता २४ वर पोहोचली आहे. भारताने आतापर्यंत ५ सुवर्ण, ८ रौप्य आणि ११ कांस्य पदके जिंकली आहेत.

धरमबीरची अंतिम फेरीतील कामगिरी:

  • प्रहिला थ्रो- फाऊल
  • दुसरा थ्रो- फाऊल
  • तिसरा थ्रो- फाऊल
  • चौथा थ्रो- फाऊल
  • पाचवा थ्रो- ३४.९२ मीटर
  • सहावा थ्रो- ३१.५९ मीटर


अंतिम फेरीत प्रणव सुरमाची कामगिरी:

  • पहिला थ्रो- ३४.५९ मीटर
  • दुसरा थ्रो- ३४.१९ मीटर
  • तिसरा थ्रो- फाऊल
  • चौथा थ्रो- ३४.५० मीटर
  • पाचवा थ्रो - ३३.९० मीटर
  • सहावा थ्रो - ३३.७० मीटर


पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मधील भारताचे पदक विजेते

  1. अवनी लेखरा (नेमबाजी) – सुवर्णपदक, महिला 10 मीटर एअर रायफल (SH1)
  2. मोना अग्रवाल (नेमबाजी) – कांस्य पदक, महिला 10 मीटर एअर रायफल (SH1)
  3. प्रीती पाल (ॲथलेटिक्स) – कांस्यपदक, महिलांची 100 मीटर शर्यत (T35)
  4. मनीष नरवाल (नेमबाजी) – रौप्य पदक, पुरुष 10 मीटर एअर पिस्तूल (SH1)
  5. रुबिना फ्रान्सिस (शूटिंग) – कांस्य पदक, महिला 10 मीटर एअर पिस्तूल (SH1)
  6. प्रीती पाल (ॲथलेटिक्स) – कांस्यपदक, महिलांची 200 मीटर शर्यत (T35)
  7. निषाद कुमार (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष उंच उडी (T47)
  8. योगेश कथुनिया (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष डिस्कस थ्रो (F56)
  9. नितीश कुमार (बॅडमिंटन) – सुवर्णपदक, पुरुष एकेरी (SL3)
  10. मनीषा रामदास (बॅडमिंटन) – कांस्य पदक, महिला एकेरी (SU5)
  11. तुलसीमाथी मुरुगेसन (बॅडमिंटन) – रौप्य पदक, महिला एकेरी (SU5)
  12. सुहास एल यथीराज (बॅडमिंटन) – रौप्य पदक, पुरुष एकेरी (SL4)
  13. शीतल देवी-राकेश कुमार (तिरंदाजी) – कांस्य पदक, मिश्र कंपाउंड ओपन
  14. सुमित अँटील (ॲथलेटिक्स) – सुवर्णपदक, पुरुष भालाफेक (F64 श्रेणी)
  15. नित्या श्री सिवन (बॅडमिंटन) – कांस्य पदक, महिला एकेरी (SH6)
  16. दीप्ती जीवनजी (ॲथलेटिक्स) – कांस्यपदक, महिला 400 मीटर (T20)
  17. मरियप्पन थांगावेलू (ॲथलेटिक्स) – कांस्य पदक, पुरुष उंच उडी (T63)
  18. शरद कुमार (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष उंच उडी (T63)
  19. अजित सिंग (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष भालाफेक (F46)
  20. सुंदरसिंग गुर्जर (ॲथलेटिक्स) – कांस्य पदक, पुरुष भालाफेक (F46)
  21. सचिन सर्जेराव खिलारी (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष शॉटपुट (F46)
  22. हरविंदर सिंग (तिरंदाजी) – सुवर्ण पदक, पुरुष वैयक्तिक रिकर्व्ह ओपन
  23. धरमबीर (ॲथलेटिक्स) – सुवर्णपदक, पुरुषांचा क्लब थ्रो (F51)
  24. प्रणव सुरमा (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष क्लब थ्रो (F51)

Web Title: Paris Paralympics 2024 Day 7 Dharambir and Pranav Soorma bag gold and silver respectively in Mens Club Throw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.