पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताला 25वे पदक, ज्युडोत कपिल परमारने पटकावले कांस्य
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 09:53 PM2024-09-05T21:53:59+5:302024-09-05T21:54:53+5:30
Paris Paralympics 2024 :पॅरालिम्पिकच्या इतिहासात भारताने पहिल्यांदाच ज्युडोमध्ये पदक जिंकले आहे.
Paris Paralympics 2024 : पॅरिसमध्ये आयोजित पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारतीय खेळाडू नवनवे विक्रम करत आहेत. दरम्यान, आज कपिल परमारने पुरुषांच्या पॅरा ज्युडो 60 KG (J1) स्पर्धेत मध्ये कांस्यपदक पटकावले आहे. विशेष म्हणजे, पॅरालिम्पिकच्या इतिहासात भारताने पहिल्यांदाच ज्युडोमध्ये पदक जिंकले आहे.
5 सप्टेंबर (गुरुवार) रोजी झालेल्या कांस्यपदकाच्या लढतीत कपिलने ब्राझीलच्या एलिटॉन डी ऑलिव्हेराचा एकतर्फी 10-0 असा पराभव केला. कपिलच्या कांस्यपदकासह भारताच्या पदकांची संख्या आता 25 वर पोहोचली आहे. भारताने आतापर्यंत 5 सुवर्ण, 8 रौप्य आणि 12 कांस्य पदके जिंकली आहेत.
Kapil paaji tussi chha gaye! 💯🙌
— JioCinema (@JioCinema) September 5, 2024
Defeating WR 2 Elielton De Oliveira, Kapil Parmar secures India's first-ever Paralympic medal in Judo! 🔥
#ParalympicGamesParis2024#ParalympicsOnJioCinema#JioCinemaSports#Judopic.twitter.com/HrnycLbP4I
कपिल परमारने उपांत्यपूर्व फेरीत व्हेनेझुएलाच्या मार्को डेनिस ब्लँकोचा 10-0 असा पराभव केला होता. मात्र उपांत्य फेरीत त्याला इराणच्या एस. बनिताबाचा खोर्रम आबादीने पराभूत केले. या दोन्ही सामन्यात परमारला यलो कार्ड मिळाले होते. उपांत्य फेरीतील पराभवाने त्याचे सुवर्ण जिंकण्याचे स्वप्न निश्चितच भंगले, मात्र आता त्याने कांस्यपदक जिंकून नवा इतिहास रचला आहे.
पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मधील भारताचे पदक विजेते
1. अवनी लेखरा (नेमबाजी) – सुवर्णपदक, महिला 10 मीटर एअर रायफल
2. मोना अग्रवाल (नेमबाजी) – कांस्य पदक, महिला 10 मीटर एअर रायफल
3. प्रीती पाल (ॲथलेटिक्स) – कांस्यपदक, महिला 100 मीटर शर्यत
4. मनीष नरवाल (नेमबाजी) – रौप्य पदक, पुरुष 10 मीटर एअर पिस्तूल
5. रुबिना फ्रान्सिस (नेमबाजी) – कांस्य पदक, महिला 10 मीटर एअर पिस्तूल
6. प्रीती पाल (ॲथलेटिक्स) – कांस्यपदक, महिलांची 200 मीटर शर्यत (T35)
7. निषाद कुमार (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष उंच उडी
8. योगेश कथुनिया (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष डिस्कस थ्रो
9. नितीश कुमार (बॅडमिंटन) – सुवर्णपदक, पुरुष एकेरी
10. मनीषा रामदास (बॅडमिंटन) – कांस्य पदक, महिला एकेरी
11. तुलसीमाथी मुरुगेसन (बॅडमिंटन) – रौप्य पदक, महिला एकेरी
12. सुहास एल यथीराज (बॅडमिंटन) – रौप्य पदक, पुरुष एकेरी
13. शीतल देवी-राकेश कुमार (तिरंदाजी) – कांस्य पदक, मिश्र कंपाउंड ओपन
14. सुमित अँटील (ॲथलेटिक्स) – सुवर्णपदक, पुरुष भालाफेक
15. नित्या श्री सिवन (बॅडमिंटन) – कांस्य पदक, महिला एकेरी
16. दीप्ती जीवनजी (ॲथलेटिक्स) – कांस्यपदक, महिला 400 मीटर
17. मरियप्पन थांगावेलू (ॲथलेटिक्स) – कांस्य पदक, पुरुष उंच उडी
18. शरद कुमार (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष उंच उडी
19. अजित सिंग (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष भालाफेक
20. सुंदरसिंग गुर्जर (ॲथलेटिक्स) – कांस्यपदक, पुरुष भालाफेक
21. सचिन सर्जेराव खिलारी (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष शॉटपुट
22. हरविंदर सिंग (तिरंदाजी) – सुवर्ण पदक, पुरुष वैयक्तिक रिकर्व्ह ओपन
23. धरमबीर (ॲथलेटिक्स) – सुवर्णपदक, पुरुषांचा क्लब थ्रो
24. प्रणव सुरमा (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष क्लब थ्रो
25. कपिल परमार (जुडो) – कांस्य पदक, पुरुष 60 किलो