Paris Paralympics 2024 : सुवर्ण थोडक्यात हुकलं! निषादच्या 'उंच उडी'सह भारत पुन्हा चंदेरी दुनियेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 12:21 AM2024-09-02T00:21:44+5:302024-09-02T01:08:54+5:30

निषाद कुमार याने सलग दुसऱ्यांदा जगातील मानाच्या स्पर्धेत भारताची मान उंचावणारी कामगिरी करुन दाखवली आहे. 

Paris Paralympics 2024 Nishad Kumar Wins silver In Men’s High Jump T47 India’s 7th Medal At Paralympic Games In Paris | Paris Paralympics 2024 : सुवर्ण थोडक्यात हुकलं! निषादच्या 'उंच उडी'सह भारत पुन्हा चंदेरी दुनियेत

Paris Paralympics 2024 : सुवर्ण थोडक्यात हुकलं! निषादच्या 'उंच उडी'सह भारत पुन्हा चंदेरी दुनियेत

Paris Paralympics 2024 Nishad Kumar Wins Silver : भारतीय पॅरालिम्पियन आणि उंच उडीपटू निषाद कुमार याने पॅरिसमध्ये ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. हंगामातील सर्वोत्तम कामगिरीसह निषाद याने भारताच्या खात्यात आणखी एका रौप्य पदकाची भर घातली. टोकियोतील पहिल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक पटकवणाऱ्या निषाद कुमार याने सलग दुसऱ्यांदा जगातील मानाच्या स्पर्धेत भारताची मान उंचावणारी कामगिरी करुन दाखवली आहे.   

सुवर्ण पदकासाठी दिली कडवी झुंज, शेवटी अमेरिकन खेळाडूनं मारली बाजी

पॅरालिम्पिक स्पर्धेतील उंच उडी प्रकारातील टी४७ प्रकारात  (High Jump T47) त्याने भारतासाठी पुन्हा एकदा रौप्य  पदकाची कमाई केली आहे. दुसऱ्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतासाठी सलग दुसरे पदक मिळवण्याचा पराक्रम त्याने करून दाखवला.  उंची उडी टी ४७ प्रकारात सुर्वण पदकासाठी भारताचा निषाद कुमार आणि अमेरिकेचा रॉड्रिक टाउनसेंड-रॉबर्ट्‌स यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळाली.

निषादनं दोन वेळा घेतली होती आघाडी

२ मीटर उंच उडीसह निषाद अंतिम फेरीत आघाडीवर पोहचला होता. त्यानंतर अमेरिकेच्या  रॉड्रिक टाउनसेंड-रॉबर्ट्‌स याने २.०२ मीटर उंच उडीसह त्याला मागे टाकले. पुन्हा निषाद कुमारनं २.०४ मीटर उंच उडीसह पुन्हा अव्वलस्थानी झेप घेतली. मग रॉड्रिक टाउनसेंड-रॉबर्ट्‌स २.०६ मीटर उंच उडी मारत पुन्हा आघाडीवर पोहचला. शेवटी अमेरिकन खेळाडूनं २.१२ मीटरसह  सुवर्ण पदकावरील आपली दावेदारी पक्की केली. परिणामी निषादला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. यंदाच्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताचे हे दुसरे रौप्य पदक असून एकूण पदकांचा आकडा ७ वर पोहचला आहे.

दुसऱ्या रौप्यसह भारताच्या खात्यात सातवे पदक

निषाद कुमार याने जिंकलेल्या रौप्य पदकासह भारताच्या खात्यात ७ पदके जमा झाली आहेत. यात १ सुवर्ण, २ रौप्य आणि ४ कांस्य पदकांचा समावेश आहे.  एक नजर पदकाला गवसणी घालणाऱ्या भारतीय खेळाडूंवर 

  • अवनी लेखरा- १० मीटर एअर रायफल एसएच१ प्रकारात सुवर्ण पदक
  • मनीष नरवाल-१० मीटर एअर पिस्तूल एसएच १ प्रकारात रौप्य पदक
  • निषाद कुमार - उंच उडी  टी४७ प्रकारात रौप्य पदक
  • मोना अग्रवाल-१० मीटर एअर रायफल एसएच१ 
  • रुबिना फ्रान्सिस- महिला गटातील १० मीटर एअर पिस्तूल एसएच १ प्रकारात कांस्य पदक
  •  प्रीती पाल - महिला गटातील १०० मीटर धावण्याची शर्यत टी ३५ प्रकारात कांस्य पदक
  • प्रीती पाल - महिला गटातील २०० मीटर धावण्याची शर्यत टी ३५ प्रकारात कांस्य पदक
     

Web Title: Paris Paralympics 2024 Nishad Kumar Wins silver In Men’s High Jump T47 India’s 7th Medal At Paralympic Games In Paris

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.