पॅरिसमध्ये 'गोल्ड'चा सिक्सर! Google सर्च करून पॅरा खेळात शिरलेल्या Praveen Kumar नं रचला नवा इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 04:31 PM2024-09-06T16:31:27+5:302024-09-06T16:37:44+5:30

सर्वोत्तम कामगिरीसह नवा क्षेत्रीय (AR) रेकॉर्ड सेट करत सुवर्ण पदकाला गवसणी

Paris Paralympics 2024 Praveen Kumar Wins Gold For India In Men's High Jump T64 Final | पॅरिसमध्ये 'गोल्ड'चा सिक्सर! Google सर्च करून पॅरा खेळात शिरलेल्या Praveen Kumar नं रचला नवा इतिहास

पॅरिसमध्ये 'गोल्ड'चा सिक्सर! Google सर्च करून पॅरा खेळात शिरलेल्या Praveen Kumar नं रचला नवा इतिहास

Paris Paralympics 2024 Praveen Kumar Wins Gold : पॅरिस येथील पॅरालिम्पिक स्पर्धेत शुक्रवारी भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर पडली. प्रवीण कुमार (Praveen Kumar) याने पुरुष गटातील उंच उंडीतील टी-६४  क्रीडा प्रकारात (Men's High Jump T64 ) पदकी कामगिरी केली. २.०८ मीटर उंच उडीसह त्याने सर्वोत्तम कामगिरीसह नवा क्षेत्रीय (AR) रेकॉर्ड सेट करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. भारताच्या खात्यातील  हे सहावे गोल्ड आहे.

पॅरालिम्पिक स्पर्धेत  उंच उडीत सुवर्ण कामगिरी करणारा दुसरा खेळाडू 

प्रवीण कुमार याने गत टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक पटकावले होते. सलग दुसऱ्यांदा पदकाला गवसणी घालताना त्याने आपल्या पदकाचा रंग बदलत भारताच्या खात्यात सुवर्ण पदकाची भर घातली.  मरियप्पन थंगावेलू याच्यानंतर पॅरालिम्पिक स्पर्धेत उंच उडी क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक पटकवणारा  प्रवीण कुमार हा दुसरा खेळाडू आहे. 

खेळाची आवड,  गुगल सर्चच्या माध्यमातून शोधला  मार्ग

जन्मापासून अपंगत्व असताना प्रवीण शाळेत असल्यापासून खेळात सक्रीय असायचा. पॅरा अ‍ॅथलिट्स होऊन जागतिक स्पर्धेत कसे सहभागी होता येईल, याची माहिती त्याने गुगल सर्च इंजिनच्या  माध्यमातून आत्मसात केली. आता त्याने जगाच्या मानाच्या स्पर्धेत देशाची मान उंचावणारी कामगिरी करून दाखवली आहे. 

अमेरिकन खेळाडूनं फाईट दिली, पण भारतीयापुढे तो खूपच मागे पडला

अमेरिकेच्या डेरेक लाक्सिडेंट याने या क्रीडा प्रकारात २.०६ मीटर उंच उडी मारत पॅरालिम्पिक रेकॉर्डसह रौप्य पदक पटकावले. उझबेगिस्तानच्या टेमुरबेक गियाझोव याने २.०३ मीटर सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीसह कांस्य पदकाला गवसणी घातली.
 

 

Web Title: Paris Paralympics 2024 Praveen Kumar Wins Gold For India In Men's High Jump T64 Final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.