Paris Paralympics 2024: दृष्टीहीन Simran Sharma ची कमाल; भिंगरीसारखी धावली अन् पटकावलं मेडल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2024 11:51 PM2024-09-07T23:51:12+5:302024-09-07T23:54:56+5:30

पॅरिसमध्ये कमालीच्या कामगिरीसह भारतीय खेळाडूंनी पदकांची अक्षरश: लयलुट केलीये.

Paris Paralympics 2024 Simran wins bronze in women’s 200m T12; Navdeep bags silver in Javelin F41 final | Paris Paralympics 2024: दृष्टीहीन Simran Sharma ची कमाल; भिंगरीसारखी धावली अन् पटकावलं मेडल

Paris Paralympics 2024: दृष्टीहीन Simran Sharma ची कमाल; भिंगरीसारखी धावली अन् पटकावलं मेडल

भारताच्या सिमरन शर्मानं (Simran Sharma) शनिवारी ७ सप्टेंबरला झालेल्या पॅरिस पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेतील महिला गटातील २०० मीटर टी-१२  प्रकारात फायली बाजी मारली. २४.७५ सेकंद वेळ नोंदवत तिने भारतासाठी यंदाच्या पॅरालिम्पिक स्पर्धेतील २८ वे पदक निश्चित केले.

प्री मॅच्युअर बेबीच्या रुपात जन्म; काचेच्या पेटीतून बाहेर काढल्यावर कळलं होतं तिला दृष्टी नाही   

सिमरन शर्मा ही महिला गटातील  १०० मीटर टी-१२ प्रकारातही सहभागी झाली होती. पण यावेळी तिचे पदक सेकंदाच्या अवघ्या काही भागांनी हुकले होते. ०.०५ सेकंद एवढाच काय तो फरक. अन् पदक मिळता मिळता राहून गेले. पण पोरीनं जिद्द सोडली नाही. जे झालं ते विसरुन ती मैदानात उतरली अन् जे घडलं ते साऱ्या जगानं पाहिले. या दृष्टिहिन पोरीनं डोळस लोकांसमोर भारतासाठी एक नवा इतिहास रचला. 

२०० मीटर टी १२ प्रकारात तिनं कसर भरून काढली

महिला गटातील २०० मीटर टी-१२ प्रकारात क्यूबाच्या ओमारा डूरंड एलियास हिने २३.६२ सेकंदात शर्यत पार करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. दुसऱ्या स्थानावर राहिलेल्या व्हेनेझुएलाच्या पाओला एलेजांद्रा पेरेझ लोपेझ हिने २४.१९ सेकंद वेळ घेत रौप्य पदकावर कब्जा केला. पहिल्या दोन स्थानासाठी या दोघींमध्ये फाईट होणार ते जवळपास स्पष्ट होते. पण तिसऱ्या क्रमांकासाठी भारतीय खेळाडूसमोर इराणी खेळाडूचं मोठ चॅलेंज होते. हजर सफरजादेह  वेग पकडण्यात सिमरनपेक्षा वरचढ होती. त्यामुळे पुन्हा एकदा १०० मीटर रेसप्रमामे  चौथे स्थान वाट्याला येण्याचा धोका होता. पण सिमरनच्या मनात वेगळचं काहीतरी सुरु होते. भारताच्या लेकीनं अखेरच्या टप्यात सर्वस्व पणाला लावून धाव बाजी आपल्या बाजूनं पलटली.   

सिमरनचा संघर्षमय प्रवास

२४ वर्षीय सिमरन शर्मा ही अनेक अडथळ्यांच्या शर्यत पार करत इथपर्यंत पोहचली आहे. ती एक प्री मॅच्युअर बेबीच्या रुपात जन्माला आली. वेळेआधी जन्माला येणाऱ्या बाळाची रोगप्रतिकारक शक्ती योग्यरित्या विकसित झालेली नसते. जवळपास १० आठवडे काचेच्या पेटीत ठेवल्यानंतर तिला दृष्टी नसल्याची गोष्ट समोर आली होती. आज भारताची ही लेक दैदिप्यमान कामगिरीनं कामगिरीनं देशाचे नाव रोशन करताना दिसत आहे.

भालाफेकमध्ये रौप्यचं झालं सुवर्ण

भारतीय पॅरालिम्पियन आणि भालाफेकपटू  नवदीप सिंग(Navdeep Singh  यानंही पॅरिसचं मैदान मारलं आहे. पुरुष गटातील भालाफेक  F41 प्रकारातील पात्रता फेरीत चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या नवदीपनं अंतिम फेरीत दुसऱ्या स्थानासह रौप्य पदकाला गवसणी घातली. जे पदक सुवर्णमध्ये रुपांतरित झाले. 

Web Title: Paris Paralympics 2024 Simran wins bronze in women’s 200m T12; Navdeep bags silver in Javelin F41 final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.