अजमल गोलंदाजी चाचणीत पास

By admin | Published: January 16, 2015 04:06 AM2015-01-16T04:06:23+5:302015-01-16T04:06:23+5:30

पाकिस्तानचा निलंबित फिरकी गोलंदाज सईद अजमल इंग्लंडमधील ऐजबेस्टन येथे करण्यात आलेल्या गोलंदाजी चाचणीत पास झाला आहे़

Pass in Ajmal bowling test | अजमल गोलंदाजी चाचणीत पास

अजमल गोलंदाजी चाचणीत पास

Next

कराची : पाकिस्तानचा निलंबित फिरकी गोलंदाज सईद अजमल इंग्लंडमधील ऐजबेस्टन येथे करण्यात आलेल्या गोलंदाजी चाचणीत पास झाला आहे़ मात्र, आता त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (आयसीसी) अधिकृत चाचणी पास करावी लागेल़
अजमलने नुकतेच ऐजबेस्टनमधील खासगी प्रयोगशाळेत गोलंदाजी परीक्षण केले होते़ यामध्ये पास झाल्याचे त्याने सांगितले आहे़ तो म्हणाला, की ऐजबेस्टनमधील गोलंदाजी परीक्षणात मी पास झालो, याचे समाधान आहे़ या चाचणीत मी आयसीसीच्या नियमानुसारच गोलंदाजी करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे़ गतवर्षी सप्टेंबरमध्ये संशयास्पद गोलंदाजी शैलीमुळे आयसीसीने त्याच्यावर आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्यास बंदी घातली आहे़
दरम्यान, आता चेन्नई येथील आयसीसीच्या अधिकृत गोलंदाजी परीक्षण केंद्रात त्याची चाचणी होणार आहे़ (वृत्तसंस्था)

Web Title: Pass in Ajmal bowling test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.