पटेल-रायडूची अर्धशतकी खेळी, पंजाबसमोर विजयासाठी १९० धावांचे लक्ष्य

By admin | Published: April 25, 2016 09:42 PM2016-04-25T21:42:38+5:302016-04-25T21:47:47+5:30

पार्थिव पटेल आणि अंबाती रायडू यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने पंजाब समोर १९० धावांचे आव्हान ठेवले. मुंबईने निर्धारित २० षटकात ६ गड्यांच्या मोबदल्यात धावा १८९ केल्या.

Patel-Ryudu's half century helped Punjab to score 190 runs in front of Punjab | पटेल-रायडूची अर्धशतकी खेळी, पंजाबसमोर विजयासाठी १९० धावांचे लक्ष्य

पटेल-रायडूची अर्धशतकी खेळी, पंजाबसमोर विजयासाठी १९० धावांचे लक्ष्य

Next
>ऑनलाइन लोकमत
मोहाली, दि. २५ - पार्थिव पटेल आणि अंबाती रायडू यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने पंजाबसमोर १९० धावांचे आव्हान ठेवले. मुंबईने निर्धारित २० षटकात ६ गड्यांच्या मोबदल्यात १८९ धावा  केल्या. पार्थिव पटेलने धडाकेबाज फलंदाजी करताना ५८ चेंडूत १० चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ८१ धावा केल्या. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना पंजाब संघाने दमदार सुरवात केली. पहिल्याच षटकात संदीप शर्माने कर्णधार रोहित शर्माला बाद केले. शर्मा बाद झाल्यानंतर दबावात आलेल्या मुंबई संघाने संथ सुरवात केली. मैदानावर जम बसल्यानंतर रायडू-पटेलने पंजाबची गोलंदाजी तोडून काढली.
 
रायडू - पटेलने दुसऱ्या विकेटसाठी १३७ धावांची भागीदारी केली, १४.१ षटकात प्रतिषटक ९.६७च्या सरासरीने त्यांनी धावा चोपल्या. अबाती रायडूने धडाकेबाज फलंदाजी करताना ३७ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने ६७ धावांचे योगदान दिले. रायडू बाद झाल्यानंतर बटलरने १३ चेंडूत झटपट २४ धावांचे योगदान दिले. त्याने १ षटकार आणि ३ चौकार लगावले. पार्थिव पटेल आणि बटलर यांच्या दरम्यान ३ विकेटसाठी ३.२ षटकात ३७ धावांची भागीदारी झाली.
 
पटेल बाद झाल्यानंतर पालार्डला आपल्या लौकीकास साजेशी खेळी करता आली नाही. मोहित शर्माने शेवटच्या २ चेंडूवर २ फलंदाज बाद केले. पोलार्डने १० आणि हार्दिक पांड्याने ४ धावांचे योगदान दिले. रायडूला ९व्या षटकात जिवदान मिळाले तर पटेलला ५व्या षटकात जिवदान मिळाले. मिळेलेल्या जिवदानाचा दोघानी पुरेपुर फायदा घेतला. पंजाबकडून मोहित शर्माने ३ फलंदाजाला बाद केले तर संदिप शर्मो, अक्षर पटेल, जॉनसन ने प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केले. 
 

Web Title: Patel-Ryudu's half century helped Punjab to score 190 runs in front of Punjab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.