जयपूरला नमवून पाटणा उपांत्य फेरीत

By admin | Published: August 19, 2015 11:11 PM2015-08-19T23:11:18+5:302015-08-19T23:11:18+5:30

दोनही संघांसाठी ‘करो या मरोची लढाई’ असणाऱ्या उत्कंठावर्धक सामन्यांत पाटणा पायरेट्स संघाने जयपूर पिंक पँथर्स संघावर २६-२४ असा निसटता विजय

In the Patna semifinal match to beat Jaipur | जयपूरला नमवून पाटणा उपांत्य फेरीत

जयपूरला नमवून पाटणा उपांत्य फेरीत

Next

विशाल शिर्के, पुणे
दोनही संघांसाठी ‘करो या मरोची लढाई’ असणाऱ्या उत्कंठावर्धक सामन्यांत पाटणा पायरेट्स संघाने जयपूर पिंक पँथर्स संघावर २६-२४ असा निसटता विजय मिळवीत उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. ताए डेओक इओम, गुरविंदरसिंग, दीपक व संदीप नरवाल यांच्या खेळीने पाटणाचा विजय झाला.
म्हाळुंगे-बालेवाडी येथील क्रीडा संकुलात ही अटीतटीची लढत झाली. जयपूर पिंक पँथर्सचा मालक अभिषेक बच्चन याने सामन्याला हजेरी लावली होती. पटणा पायरेट्स व जयपूर पिंक पँथर यांच्यातील सामन्यात पहिल्या हापमध्ये पाटणाचे वर्चस्व राहिले. आक्रमणाला संरक्षणाची अप्रतिम साथ मिळाल्याने पाटणा पायरेट्सने वर्चस्व गाजविले. पाटणाच्या गुरविंदर सिंग, ताए डेओक इओम यांनी आक्रमणाबरोबरच उत्कृष्ट संरक्षण केले. इओम याने अष्टपैलू खेळी करीत संघाला वर्चस्व मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. त्याला राकेश कुमार, संदीप नरवाल यांच्या पकडीची मोलाची साथ लाभली. त्यामुळे १२ व्या मिनिटाला जयपूर पँथरवर लोन चढविण्यात पाटणा पायरेट्स यशस्वी ठरले. मध्यंतरापर्यंत पाटणाकडे १६-९ अशी भक्कम आघाडी होती.
जयपूर संघाकडून राजेश नरवाल याने आक्रमक चढाया करीत पाटणा पायरेट्सला जेरीस आणले. उत्तरार्धात राजेश नरवाल, रणसिंग, सोनू नरवाल, जसवीर सिंग यांनी सुरेख खेळ करीत पिछाडी भरुन काढली. सामन्याच्या ३५ व्या मिनिटाला पाटणा केवळ २३-२० असे आघाडीवर होते. उत्तरार्धात राजेश नरवाल, रणसिंग, सोनू नरवाल, जसवीर यांनी आक्रमक खेळ केला. मात्र त्यांची खेळी संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरली.

Web Title: In the Patna semifinal match to beat Jaipur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.