ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 7 - पुणे कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या दारुण पराभवाची भारताने आज सव्याज परतफेड केली. हाती अवघ्या 187 धावा असताना रविचंद्रन अश्विनने टिपलेले सहा बळी आणि त्याला उमेश यादव आणि रवींद्र जडेजाकडून मिळालेल्या सुरेख साथीच्या जोरावर भारताने बंगळुरू कसोटी ऑस्ट्रेलियावर 75 धावांनी सनसनाटी विजय मिळवला. त्याबरोबरच चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-1 अशी बरोबरी साधली. सामन्यातील दोन्ही डावात अर्धशतकी खेळी करणाऱ्या लोकेश राहुलने सामनावीराचा मान पटकावला.
गोलंदाजांचे नंदनवन ठरलेल्या चिन्नास्वामीच्या खेळपट्टीवर चौथ्या दिवशी भारताची भारताच्या तळाच्या फलंदाजांनी निराशा केली. पुजारा आणि रहाणेची जोडी माघारी परतल्यानंतर तळाच्या फलंदाजांनी निराशा केल्याने भारताला अवघी 187 धावांचीच आघाडी घेता आली. त्यामुळे भारतीय क्रिकेटप्रेमींच्या चिंतेत वाढ झाली होती. भारताने दिलेल्या 188 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने आक्रमक सुरुवात केली. पण मॅट रेनेशॉला (5) बाद करत इशांत शर्माने भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर वॉर्नर आणि स्मिथने वेगाने धावा फटकावत भारतावर दबाव आणला.
पण दुसऱ्या डावात कांगारूंचा कर्दनकाळ ठरलेल्या रविचंद्रन अश्विनने कांगारूंंना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवत भारताला विजयाच्या दिशेने नेले. अश्विनने वॉर्नरची (17) काढलेली विकेट डावाला कलाटणी देणारी ठरली. पाठोपाठ उमेश यादवने शॉन मार्श (9) आणि स्टीव्हन स्मिथच्या (28) विकेट काढत ऑस्ट्रेलियाला अडचणीत आणले. त्यानंतर चहापानापूर्वी अश्विनने मिचेल
मार्श आणि मॅथ्यू वेडची विकेट काढत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले.
चहापानानंतर अश्विनने ऑस्ट्रेलियाचे शेपूट कापून काढत ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 112 धावांत गुंडाळला. भारताकडून अश्विनने सहा, उमेशने दोन आणि जडेजा व इशांतने प्रत्येकी एक गडी बाद केला. तत्पूर्वी कालची नाबाद असलेली अजिंक्य रहाणे (52) आणि चेतेश्वर पुजाराची (92) जोडी तंबूत परतल्यावर भारताचा डाव कोसळला. जोश हेझलवूड आणि मिचेल स्टार्कने भारताचे शेपूट कापून काढत भारताचा दुसरा डाव 274 धावांवर संपुष्टात आणला.
धावफलक
भारत पहिला डाव १८९. आॅस्ट्रेलिया पहिला डाव २७६. भारत दुसरा डाव :-
लोकेश राहुल झे. स्मिथ गो. ओकीफे ५१, अभिनव मुकुंद त्रि.गो. हेजलवूड १६,
चेतेश्वर पुजारा झे. मिशेल मार्श गो. हेजलवूड ९२, विराट कोहली पायचित गो.
हेजलवूड १५, रवींद्र जडेजा त्रि.गो. हेजलवूड ०२, अजिंक्य रहाणे पायचित
गो. हेजलवूड ५२, करुण नायर त्रि.गो. स्टार्क ००, रिद्धिमान साहा नाबाद
२०, रविचंद्रन आश्विन त्रि.गो. हेजलवूड ०४, उमेश यादव झे. वॉर्नर गो.
हेजलवूड ०१, ईशांत शर्मा झे. शॉन मार्श गो. ओकीफे ०६. अवांतर (१५). एकूण
९७.१ षटकांत सर्वबाद २७४.
बाद क्रम : १-३९, २-८४, ३-११२, ४-१२०, ५-२३८,
६-२३८, ७-२४२, ८-२४६, ९-२५८, १०-२७४.
गोलंदाजी : स्टार्क १६-१-७४-२, हेजलवूड २४-५-६७-६, लियोन ३३-४-८२-०, ओकीफे २१.१-३-३६-२, मिशेल मार्श
३-०-४-०.
आॅस्ट्रेलिया दुसरा डाव :- डेव्हिड वॉर्नर पायचित गो. आश्विन १७, मॅट
रेनशॉ झे. साहा गो. ईशांत ०५, स्टीव्हन स्मिथ पायचित गो. यादव २८, शॉन
मार्श पायचित गो. यादव ०९, पीटर हँड््सकोंब गो. साहा गो. अश्विन २४,
मिशेल मार्श झे. नायर गो. अश्विन १३, मॅथ्यू वेड झे. साहा गो. आश्विन ००,
मिशेल स्टार्क त्रि.गो. आश्विन ०१, स्टीव्ह ओकीफे त्रि.गो. जडेजा ०२,
नॅथन लियोन झे. व गो. आश्विन ०२, जोश हेजलवूड नाबाद ००. अवांतर (११).
एकूण ३५.४ षटकांत सर्वबाद ११२.
बाद क्रम : १-२२, २-४२, ३-६७, ४-७४,
५-१०१, ६-१०१, ७-१०३, ८-११०, ९-११०, १०-११२.
गोलंदाजी : ईशांत शर्मा
६-१-२८-१, आश्विन १२.४-४-४१-६, यादव ९-२-३०-२, जडेजा ८-५-३-१.
Web Title: Payback rate for Pune! Equals in India's series
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.