पीसीबीने शोएब अख्तरला ७० लाख परत दिले
By admin | Published: July 7, 2015 08:49 PM2015-07-07T20:49:42+5:302015-07-07T21:35:12+5:30
पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तरला मिळालेल्या मानधनातून दंड म्हणून कापून घेण्यात आलेले एकूण ७० लाख परत करण्याचा निर्णय पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने घेतला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
कराची, दि. ७ - पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तरला मिळालेल्या मानधनातून दंड म्हणून कापून घेण्यात आलेले एकूण ७० लाख परत करण्याचा निर्णय पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने घेतला आहे.
येथील गद्दाफी स्टेडियममध्ये नजम सेठी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी शोएब अख्तरसोबतच अन्य क्रिकेट बोर्डाचे अन्य अधिकारीही उपस्थित होते.
शोएब अख्तरच्या मानधनातून दंड म्हणून कापून घेण्यात आलेले जवळजवळ ७० लाख परत करण्याचा निर्णय घेतला असून हा विषय आता इथेच संपला आहे. या निर्णयामुळे शोएब अख्तर सुद्धा खुश असल्याचे नजम सेठी यांनी सांगितले.
शोएब अख्तरने २००९ मध्ये मैदानात खेळताना काही नियमांचे उल्लंघन केले होते. याप्रकरणी शिक्षा म्हणून त्याला मिऴणा-या वार्षिक मानधनातून काही प्रमाणात रक्कम कापून घेण्याचा निर्णय पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने घेतला होता.