आम्हाला पाठिंबा देण्यासाठी काश्मिरहून लोक आले आहेत - आफ्रिदी
By admin | Published: March 23, 2016 01:31 PM2016-03-23T13:31:50+5:302016-03-23T16:49:37+5:30
पाकिस्तापेक्षा भारतात जास्त प्रेम मिळते असे विधान करुन वादात सापडलेला पाकिस्तानचा कर्णधार शाहीद आफ्रिदीने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मोहाली, दि. २३ - पाकिस्तानपेक्षा भारतात जास्त प्रेम मिळते असे विधान करुन वादात सापडलेला पाकिस्तानचा कर्णधार शाहीद आफ्रिदीने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. पाकिस्तानी संघाला पाठिंबा देण्यासाठी काश्मिरमधून लोक इथे आले आहेत असे वादग्रस्त वक्तव्य आफ्रिदीने मंगळवारी पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामन्याआधी केले. नाणेफेकीच्या वेळी बोलताना काश्मिरमधूनही भरपूर लोक इथे आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आले आहेत असे विधान त्याने केले.
आफ्रिदीच्या या विधानावर नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. भारतात आल्यानंतर आफ्रिदीने भारताइतका अन्यत्र कुठेही खेळण्याचा आनंद मिळत नाही. आम्हाला भारतात जितके प्रेम मिळाले तितके प्रेम पाकिस्तानातही मिळाले नाही असे विधान केले होते.
भारताकडून झालेल्या दारुण पराभवामुळे आफ्रिदीला कर्णधारपदावरुन हटवले जाण्याची शक्यता आहे. मायदेशात परतल्यानंतर त्याला क्रिकेटरसिकांच्या रोषाचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे काही प्रमाणात तरी त्यांचा राग कमी व्हावा म्हणून आफ्रिदीने काश्मिरचा संदर्भ दिल्याची शक्यता आहे. पण यामुळे भारताची त्याने नाराजी ओढवून घेतली आहे.