‘आयपीएल’वरील लोकांचा विश्वास कायम राहील : मुदगल

By admin | Published: July 15, 2015 01:28 AM2015-07-15T01:28:52+5:302015-07-15T01:28:52+5:30

लोढा समितीने चेन्नई सुपरकिंग्ज व राजस्थान रॉयल्स यांना निलंबित केल्यामुळे ‘आयपीएल’वरील लोकांचा विश्वास कायम राहण्यास मदत होईल, असे मत

People will remain confident of IPL: Mudgal | ‘आयपीएल’वरील लोकांचा विश्वास कायम राहील : मुदगल

‘आयपीएल’वरील लोकांचा विश्वास कायम राहील : मुदगल

Next

नवी दिल्ली : लोढा समितीने चेन्नई सुपरकिंग्ज व राजस्थान रॉयल्स यांना निलंबित केल्यामुळे ‘आयपीएल’वरील लोकांचा विश्वास कायम राहण्यास मदत होईल, असे मत आयपीएलमधील सट्टेबाजीच्या प्रकरणांचा तपास करणाऱ्या समितीचे अध्यक्ष मुकुल मुदगल यांनी व्यक्त केले.

ही अत्यंत कठोर शिक्षा आहे. यामुळे आयपीएल, बीसीसीआय व खेळाडूंवर चांगला प्रभाव पडेल. अनेक लोकांना वाटते की, यामुळे खेळावर विपरीत परिणाम होईल. मात्र, हा तात्पुरता धक्का असेल, असे मला वाटते. यामुळे क्रिकेटची प्रतिमा उजाळेल व लोकांचा आयपीएलवरील विश्वास कायम राहील.
- मुकुल मुदगल

जर बीसीसीआयने यापूर्वीच जर कठोर कारवाई केली असती तर अशी परिस्थिती उद्भवली नसती. बीसीसीआयने संथगतीने ही कारवाई केली. हे प्रकरण न्यायालयात जाईल असे त्यांना वाटले नसावे. यातून आपण काही शिकायला हवे.
- निरंजन शाह, बीसीसीआयचे माजी सचिव

बीसीसीआयमधील कोणीही चुकीच्या कामाबद्दल आवाज उठवला नाही. सर्व प्रकारचे नियम अस्तित्वात आहेत. मात्र, त्यांना काही व्यक्तिंसाठी बदलण्यात आले. मला वाटते आयपीएल सुरू राहिले पाहिजे. मात्र, बीसीसीआयने आयपीएलपासून दूर राहिले
पाहिजे. आयपीएलची जबाबदारी एका वेगळ्या संस्थेकडे द्यायला हवी
- ए. सी. मुथय्या, बीसीसीआयचे माजी अध्यक्ष

या दोन्ही संघांना दोन वर्षांसाठी निलंबित करण्याच्या निर्णयावर मी सहमत नाही. गुरुनाथ मय्यप्पन व राज कुंद्रा दोषी ठरले होते. संपूर्ण संघ फिक्सिंगमध्ये सहभागी नव्हता. त्यामुळे जोपर्यंत संपूर्ण संघ अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये सहभागी नसतो तोपर्यंत संपूर्ण संघावर अशी कारवाई कशी करता येईल. संपूर्ण आयपीएलसाठी हा निर्णय निराशाजनक असेल असे
मला वाटते.’
- आर्यमा सुंदरम, बीसीसीआयचे वकील

बीसीसीआयने मयप्पनचे सासरे आयसीसीचे अध्यक्ष श्रीनिवासन यांना आपली भूमिका स्पष्ट करायला सांगायला हवे. चेन्नई सुपरकिंग्ज व मयप्पन यांना वाचवण्यासाठी श्रीनिवासनच जबाबदार आहेत. बीसीसीआयने त्यावेळीच त्यांच्यावर कारवाई करायला हवी होती व त्यांचे आयसीसीचे नामांकन रद्द करायला हवे होते. श्रीनिवासन यांना आयसीसीच्या अध्यक्षपदी राहण्याचा नैतिक अधिकार नाही.
- इंद्रजित बिंद्रा, बीसीसीआयचे माजी अध्यक्ष

‘आयसीसी’चे अध्यक्ष
एन. श्रीनिवासन यांनी ‘बीसीसीआय’चे प्रतिनिधित्व करू नये तसेच बीसीसीआयने आयसीसीच्या प्रतिनिधित्वाचे त्यांचे नामांकन रद्द करावे.
- आदित्य वर्मा

क्रिकेटवरील क्रिकेटप्रेमींचा विश्वास कायम राहण्यासाठी जे काही करायला लागेल ते करायला हवे.
- संजय मांजरेकर, माजी क्रिकेटपटू

न्या. लोढा समितीच्या निकालामुळे स्वच्छ हवा आली आहे. मात्र, अजून खूप गोष्टी शिल्लक आहेत.
- बिशनसिंग बेदी

क्रिकेटमध्ये भ्रष्टाचार सुरूझाला आहे. ही खूपच खेदजनक बाब आहे. दोन्ही संघांतील खेळाडूंसाठी ही दु:खद बाब आहे. - सय्यद किरमाणी

Web Title: People will remain confident of IPL: Mudgal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.