इटलीचा बेल्जियमविरुद्ध परफेक्ट स्टार्ट
By admin | Published: June 15, 2016 05:19 AM2016-06-15T05:19:09+5:302016-06-15T05:19:09+5:30
कोच एंटोनियो कोंटेची जबरदस्त रणनिती आणि एमानुएल गियाशेरेनी तसेच ग्राजियानो पेले यांच्या भन्नाट गोलच्या जोरावर इटलीने युरो चषक फुटबॉल स्पर्धेत बेल्जियमला २-0 ने हरवून परफेक्ट स्टार्ट केला.
लियोन : कोच एंटोनियो कोंटेची जबरदस्त रणनिती आणि एमानुएल गियाशेरेनी तसेच ग्राजियानो पेले यांच्या भन्नाट गोलच्या जोरावर इटलीने युरो चषक फुटबॉल स्पर्धेत बेल्जियमला २-0 ने हरवून परफेक्ट स्टार्ट केला.
इटलीने आपल्या पहिल्या सामन्यात जबरदस्त आक्रमता आणि सर्वोत्कृष्ट रणनितीचे दर्शन घडविले. विरोधी संघावर प्रतिहल्ले आणि बेजोड बचाव याच्या आधारावर बेल्जियमविरुध्द ४४ वर्षे अपराजित राहण्याचे रेकॉर्डही इटलीने अबाधित राखले. बेल्जियमकडून इटली १९७२ साली हरला होता.
बेल्जियमकडून ईडन हेजार्ड, केव्हीन डी ब्रुएने आणि रोमेलू लुकाकू यांनी चांगली कामगिरी केली, परंतु ते आपल्या संघाला गोल मिळवून देवू शकले नाहीत. इटालियन प्रशिक्षकांनी सामन्यात पूर्वार्धात ३-५-३ असे कॉम्बिनेशन ठेवले होते. यामध्ये माटीयो डारमियान आणि एंटोनिया कानड्रेवा यांनी आक्रमण आणि बचावाचे उत्कृष्ट उदाहरण दाखवून दिले. त्यामुळे इटलीच्या मधल्या फळीला गोल करण्याची संधी मिळत गेली. जरी चेंडूवर बेल्जियमचे नियंत्रण अधिक काळ असले तरी ३२ व्या मिनिटाला गियाशेरेनी याने इटलीला १-0 अशी आघाडी मिळवून दिली.
मध्यंतरानंतर दोन्ही संघांनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले. ५३ व्या मिनिटाला लुकाकूने ५३ व्या मिनिटाला बरोबरी करण्याची संधी वाया घालवली. यानंतर इटलीला गोल करण्याच्या सलग दोन संधी मिळाल्या होत्या.
सामना संपण्यास काही सेकंद उरले असताना पेलेचा फटका गोलरक्षक थिबाउट काउटोरिसने अडवला. यानंतर लगेचच सिरो इमोबाईलचा गोलचा प्रयत्नही यशस्वी झाला नाही. इन्ज्युरी टाईममध्ये कॉनड्रेवाच्या क्रॉसवर पेलेने गोल
करुन संघाला २-0 ने विजय मिळवून दिला.(वृत्तसंस्था)