चेंडू कुरतडल्यामुळे फिलँडरला दंड
By admin | Published: July 20, 2014 12:55 AM2014-07-20T00:55:26+5:302014-07-20T00:55:26+5:30
श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात चेंडू कुरतडल्याच्या आरोपामुळे दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी वेगवान गोलंदाज वर्नोन फिलँडर याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) दंड ठोठावला आह़े
Next
गाले : श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात चेंडू कुरतडल्याच्या आरोपामुळे दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी वेगवान गोलंदाज वर्नोन फिलँडर याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) दंड ठोठावला आह़े
फिलँडरने गाले येथे सुरू असलेल्या लंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत तिस:या दिवशी आयसीसीच्या नियम 42़1 चे उल्लंघन केल्याचे आढळून आले आह़े त्यामुळे आयसीसीने फिलँडरला मॅच फीमधून 75 टक्के रक्कम दंड ठोठावला आह़े
या सामन्यानंतर पंचांनीही व्हिडिओ चित्रीकरण पाहिल्यानंतर फिलँडर याने चेंडू कुरतडल्याचे दिसून आले आह़े या व्हिडिओमध्ये फिलँडर चेंडूला अंगठा आणि बोटाच्या साह्याने कुरतडत असल्याचे दिसत आह़े विशेष म्हणजे, फिलँडरने आरोपाचा इन्कार केला नाही; त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी घेण्याची गरज पडली नाही़
या प्रकरणी जारी केलेल्या प्रसिद्धिपत्रकात आयसीसीने म्हटले आहे, की फिलँडर दुपारी चेंडू कुरतडताना दिसला़ या घटनेचे थेट प्रक्षेपण झाले नाही; मात्र मैदानावरील पंच विली बोडेन आणि रिचर्ड केटेलबॉरोग व तिसरे पंच जेफ क्रोव्ह यांनी फुटेज तपासल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला़ (वृत्तसंस्था)