विराट-अनुष्काचे ते फोटो होतायत व्हायरल
By Admin | Published: April 12, 2017 06:18 PM2017-04-12T18:18:51+5:302017-04-12T18:18:51+5:30
दुखापतग्रस्त असल्यामुळे विराटला आयपीएलच्या काही सामन्यांना मुकावे लागले आहे. सध्या तो संघात परतण्यासाठी कसून सराव करतो आहे.
ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 12 - दुखापतग्रस्त असल्यामुळे विराटला आयपीएलच्या काही सामन्यांना मुकावे लागले आहे. सध्या तो संघात परतण्यासाठी कसून सराव करतो आहे.
उजव्या खांद्याच्या दुखापतीमुळे विराट आयपीएलच्या दहाव्या मोसमातील एकही सामना खेळू शकलेला नाही. विराट कोहलीची विचारपूस करण्यासाठी त्याची गर्लफ्रेण्ड आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा बंगळुरुमध्ये पोहोचली होती. विराट आणि अनुष्काचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये अनुष्का आणि विराट दोघेही एकाच घरातून बाहेर पडताना दिसत आहेत.
बॉर्डर गावस्कर मालिकेदरम्यान तिसऱ्या सामन्यात विराट कोहलीला क्षेत्ररक्षण करताना खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे चौथ्या कसोटी सामन्यात तो खेळू शकलेला नव्हता. विराटच्या गैरहजेरीत रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरुचे नेतृत्त्व सध्या शेट वॉटसनकडे आहे. आयपीएलमध्ये आरसीबीचा संघ तीन सामने खेळला आहे, त्यापैकी एका सामन्यात त्यांना विजय मिळवता आला आहे.
दरम्यान, विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाच्या मुंबई इंडियन्सविरुद्ध १४ एप्रिल रोजी होणाऱ्या लढतीद्वारे पुनरागमन करण्याचे संकेत दिले आहे.
कोहलीने इंस्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट केला असून त्यात तो घाम गाळत असल्याचे दिसत आहे. कोहली वेट ट्रेनिंग करीत असल्याचे या व्हिडीओमध्येदिसत असून तो हळूहळू पूर्ण फिटनेस मिळवत आहे. कोहलने पोस्टमध्ये लिहिले, की ह्यमैदानावर परतण्यासाठी आणखी प्रतीक्षा करू शकत नाही. आता पुनरागमनासाठी सज्ज आहे ??? १४ एप्रिल? कोहलीने पोस्टवर प्रश्नचिन्हही उपस्थित केले आहे. याचा अर्थ त्याचे पुनरागमन अद्याप निश्चित नाही.