पिकलबॉलची आंतरराष्ट्रीय भरारी!

By Admin | Published: September 14, 2015 12:31 AM2015-09-14T00:31:03+5:302015-09-14T00:31:03+5:30

सात-आठ वर्षांपूर्वी मुंबईत खेळण्यासाठी जागा शोधावी लागणाऱ्या पिकलबॉल या खेळाने आता आंतरराष्ट्रीय भरारी घेतली असून

Pickleball international fare! | पिकलबॉलची आंतरराष्ट्रीय भरारी!

पिकलबॉलची आंतरराष्ट्रीय भरारी!

googlenewsNext

रोहित नाईक, मुंबई
सात-आठ वर्षांपूर्वी मुंबईत खेळण्यासाठी जागा शोधावी लागणाऱ्या पिकलबॉल या खेळाने आता आंतरराष्ट्रीय भरारी घेतली असून, गेल्यावर्षी दुहेरी सुवर्णपदक मिळवून भारताची शान वाढवणाऱ्या याच खेळातील दोन खेळाडू येत्या १८ ते २० सप्टेंबर दरम्यान स्पेनमध्ये माद्रिद येथे रंगणाऱ्या आंतरराष्ट्रीय पिकलबॉल स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
द स्पॅनिश पिकलबॉल असोसिएशच्या वतीने आयोजित या दुहेरीच्या आंतररराष्ट्रीय पिकलबॉल स्पर्धेत आतापर्यंत ९ देशांतील १५० अधिक खेळाडूंनी सहभाग निश्चित केला आहे. आॅल इंडिया पिकलबॉल असोसिएशनच्या (आयपा) वतीने आंतरराष्ट्रीय पिकलबॉल स्पर्धेत भारताचा सहभाग होण्याची ही केवळ दुसरीच घटना आहे. अनिश मेहता आणि शनय मेहता या पिता - पुत्रांची जोडी भारताचे प्रतिनिधित्त्व करणार असून याआधी अतुल एडवर्ड यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर गतवर्षी मे महिन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले होते. अतुल यांनी नेदरलँडच्या स्पर्धेत दुहेरीचे सुवर्ण पटकावल्याने मेहता जोडीकडूनसुध्दा याच कामगिरीची अपेक्षा होत आहे. या स्पर्धेत अनिश ५५ वर्षांवरील वयोगटात खेळतील तर शनय १९ वर्षांवरील वयोगटात खेळेल.
गतवर्षी डिसेंबरमध्ये पिकलबॉलशी ओळख झाल्यानंतर अनिश यांनी या खेळासाठी स्वत:ला झोकून दिले. शनय हा कसलेला जिल्हास्तरीय टेबल टेनिस खेळाडू असून त्यानेही पिकलबॉलला आपलेसे केले. टेबल टेनिसचा फायदा या खेळामध्ये होत असल्याचे त्याने सांगितले. अनिश - शनय दोघेही पुरुष व मिश्र दुहेरी स्पर्धेत सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे ते या स्पर्धेसाठी स्वखर्चाने सहभाग होत आहेत. आम्ही आंतरराष्ट्रीय स्तराचा अनुभव मिळवण्यासाठी सहभाग होतोय. यावेळी आम्ही किती पाण्यात आहोत हे कळेल. विजेतेपदासाठी आमचा प्रयत्न नक्की असेल, असे अनिश यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

स्पर्धेचे वेळापत्रक :
१७ व १८ सप्टेंबरला सर्व खेळाडूंचे सराव सत्र होईल. यामधूनच प्रत्येक खेळाडूंच्या जोड्या तयार होतील. यावेळी पिकलबॉल तज्ञ जेनिफर लुकोर आणि बॉब यंग्रेन यांचे खेळाडूंना मार्गदर्शन मिळेल.
१९ सप्टेंबरला महिला व पुरुष दुहेरी तर २० सप्टेंबरला मिश्र दुहेरी सामने रंगतील.

मेहता पिता-पुत्र जोडीमुळे आम्हाला प्रोत्साहन मिळाले आहे. त्यांच्या सहभामुळे स्पेनमध्ये तिरंगा फडकला जाईल. दोघांचा खेळ उत्कृष्ट असून ते नक्कीच यशस्वी होतील. तसेच एक खात्री नक्की देऊ शकतो की, स्पर्धेत दोघांचा खेळ लक्षवेधी ठरेल. मेहता जोडीची कामगिरी नवोदितांना प्रेरणादायी ठरेल.
- सुनील वालावलकर, अध्यक्ष, आॅल इंडिया पिकलबॉल असोसिएशन

पिकलबॉल म्हणजे काय?
लॉन टेनिस, बॅडमिंटन आणि टेबल टेबल टेनिस यांचे मिश्रीत रुप म्हणजे ‘पिकलबॉल’. यामध्ये टेबल टेनिस पॅडलसारख्या आकाराने मोठ्या असलेल्या पॅडलने बॅडमिंटनच्या आकाराच्या कोर्टवर खेळावे लागते. तसेच खेळण्याची स्टाईल आणि नियम हे लॉन टेनिसप्रमाणे असतात. सोप्प्या भाषेत सांगायचे झाल्यास टेबल टेनिससारख्या पॅडलने बॅडमिंटनच्या कोर्टवर लॉन टेनिस खेळणे म्हणजेच ‘पिकलबॉल’. शारिरीक तंदुरुस्तीसाठी अत्यंत उपयोगी असलेल्या या खेळामध्ये प्लास्टीक बॉलचा वापर होतो.

Web Title: Pickleball international fare!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.