एका रात्रीत चित्र बदलले

By admin | Published: March 7, 2017 12:50 AM2017-03-07T00:50:53+5:302017-03-07T00:50:53+5:30

मालिकेत चार दिवसांच्या खेळानंतर आॅस्ट्रेलिया संघ भारतीय खेळाडूंच्या नजरेला नजर भिडवत विचारत होता

Pictures changed overnight | एका रात्रीत चित्र बदलले

एका रात्रीत चित्र बदलले

Next


हर्षा भोगले लिहितो..
मालिकेत चार दिवसांच्या खेळानंतर आॅस्ट्रेलिया संघ भारतीय खेळाडूंच्या नजरेला नजर भिडवत विचारत होता, ‘तुम्ही आम्हाला बच्चे समजले होते, पण तुम्ही तर मायदेशातच कमकुवत भासत आहात, खरे आहे ना हे?’ भारतीय संघाला अनपेक्षित कोनातून आपल्याच बॉक्सिंग ग्लव्हजमधून ठोशे स्वीकारावे लागले. चॅम्पियन्स संघ निमूटपणे हे सहन करीत असल्याचे चित्र दिसले.
या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर आणि दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला काय घडले हे मला माहीत नाही. याची माहिती घेण्यासाठी माशी बनून भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममधील भिंतीवर बसायला मला आवडले असते.
एका रात्रीत भारतीय संघाचे रूप पालटले. चवताळलेला भारतीय संघ आॅस्ट्रेलियावर चालून गेला. त्यामुळे उभय संघांदरम्यान कसोटी खेळाची रंगत अनुभवाला मिळाली. तिसऱ्या दिवशी तर भारतीय संघाने काही अंशी वर्चस्वही मिळवले. सध्या यार्ड पुढे आहे असे म्हणण्यापेक्षा इंचभर पुढे आहे, असे म्हणणे सयुक्तिक ठरेल. भारताने चाहत्यांसह आणि अधिक महत्त्वाचे म्हणजे स्वत:ला लढवय्या संघ असल्याचे दाखवून दिले.
लोकेश राहुल दर्जेदार क्रिकेटपटू म्हणून आपली पाळेमुळे घट्ट करीत आहे. चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांनी यापूर्वीच स्वत:ला सिद्ध केलेले आहे. कुठल्याही खेळाडूसाठी फलंदाजीला खडतर असलेल्या या खेळपट्टीवर या तिन्ही क्रिकेटपटूंनी शानदार खेळी केली. पहिल्या दिवसाचा खेळ बघितल्यानंतर भारतीय संघाची कामगिरी अविश्वसनीय भासत आहे. भारतात मात्र हे घडत असते.
या खेळपट्टीवर फलंदाजांनी जबाबदारीने खेळणे आवश्यक आहे. येथे १८०-२०० धावांचे लक्ष्य पुरेसे नाही. भारताला येथे ३००च्या जवळपास धावांच्या लक्ष्याची गरज आहे. त्यासाठी खेळपट्टीवर असलेल्या पुजारा व रहाणे यांच्या व्यतिरिक्त करुण नायर याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. पहिल्या
डावात चमकदार कामगिरी करणाऱ्या नॅथन लियोनचा मारा खेळताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. ३०० धावांचे लक्ष्य असले म्हणजे कोहली आणि आश्विनला संयम बाळगता येईल. कमी धावसंख्येचे लक्ष्य असेल तर त्यांच्यावर मर्यादा येईल. संयम बाळगला तर अनुकूल निकाल मिळवता येतात आणि घाई केली तर चूक होण्याची शक्यता असते.
पुजारा व रहाणे लढवय्ये फलंदाज आहेत. कारकिर्दीत त्यांनी बरेचदा अशी कामगिरी केली आहे. मंगळवारी त्यात जर ते यशस्वी ठरले तर ही मालिका पुणे सोडल्यानंतर भासली होती त्यापेक्षा नक्कीच वेगळी भासेल.
(पीएमजी)

Web Title: Pictures changed overnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.