पीटरसन बाहेर, पण द. आफ्रिकेकडून खेळणार नाही

By Admin | Published: February 20, 2016 02:36 AM2016-02-20T02:36:52+5:302016-02-20T02:36:52+5:30

भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी इंग्लंडने फलंदाज केव्हिन पीटरसनला वगळले आहे. तो द. आफ्रिकेकडून खेळेल, अशी शक्यता वर्तविली जात होती पण स्वत: पीटरसनने ही शक्यता फेटाळून लावली

Pietersen out, but D. Not playing for Africa | पीटरसन बाहेर, पण द. आफ्रिकेकडून खेळणार नाही

पीटरसन बाहेर, पण द. आफ्रिकेकडून खेळणार नाही

googlenewsNext

लंडन : भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी इंग्लंडने फलंदाज केव्हिन पीटरसनला वगळले आहे. तो द. आफ्रिकेकडून खेळेल, अशी शक्यता वर्तविली जात होती पण स्वत: पीटरसनने ही शक्यता फेटाळून लावली.
पीटरसनचा जन्म द. आफ्रिकेत झाला पण तो सुरुवातीपासून इंग्लंडकडून खेळत आहे. मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार पीटरसन द. आफ्रिकेकडून खेळणार नाहीच.
इंग्लंडचा टी-२० विश्वचषक संघ निवडण्याआधीच कर्णधार इयोन मोर्गन याने पीटरसनच्या नावाचा विचार होणार नसल्याचे सांगून टाकल्यापासून पीटरसन आपल्या देशाकडून खेळू शकतो, अशी शंका उपस्थित झाली होती. इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज डेरेन गोह याने देखील पीटरसन हा इंग्लंड संघात नसेल तर द. आफ्रिकेकडून खेळू शकतो, असे संकेत दिले होते. २००४ मध्ये कारकीर्दीला सुरुवात केल्यापासून पीटरसनचे इंग्लंड संघव्यवस्थापनासोबत कायम बिनसत आहे. या वादामुळेच गतवर्षी मे महिन्यात झालेल्या अ‍ॅशेस मालिकेसाठी संघात त्याचा विचार झाला नव्हता.(वृत्तसंस्था)

Web Title: Pietersen out, but D. Not playing for Africa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.