पायरेट्सचा धडाका कायम

By admin | Published: February 10, 2016 03:35 AM2016-02-10T03:35:21+5:302016-02-10T03:35:21+5:30

पटणा पायरेट्स संघाने झुंजार खेळाचे शानदार प्रदर्शन करताना पिछाडीवरून बाजी मारत यजमान बंगाल वॉरियर्सला ३६-३१ असा धक्का दिला. या विजयासह सलग पाचवा विजय मिळवताना

Pirates continued to beat | पायरेट्सचा धडाका कायम

पायरेट्सचा धडाका कायम

Next

- रोहित नाईक,  कोलकाता
पटणा पायरेट्स संघाने झुंजार खेळाचे शानदार प्रदर्शन करताना पिछाडीवरून बाजी मारत यजमान बंगाल वॉरियर्सला ३६-३१ असा धक्का दिला. या विजयासह सलग पाचवा विजय मिळवताना पटणाने प्रो-कबड्डी स्पर्धेमध्ये २५ गुणांसह अग्रस्थानी कब्जा केला.
नेताजी सुभाषचंद्र बोस स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात यजमानांनी अपेक्षेप्रमाणे आक्रमक सुरुवात करत वर्चस्व राखले. जँन कून ली आणि नितीन तोमार यांनी जबरदस्त चढाया करताना पटणावर दडपण टाकले. मध्यंतराला १७-१६ अशी नाममात्र आघाडी घेतलेल्या बंगालला पहिल्या डावात पटणावर दोन वेळा लोण चढवण्याची संधी होती. मात्र पहिल्यांदा गिरीश एर्नाक तर नंतर रोहित कुमार यांनी चढाईत प्रत्येकी ३ बळी घेत संघाला सावरले.
दुसऱ्या सत्रात मात्र पटणा पायरेट्सने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. २२व्या मिनिटाला बंगालवर लोण चढवून पटणाने २१-१७ अशी आघाडी घेतली. हीच आघाडी त्यांनी अखेरपर्यंत कायम राखली. यानंतर यजमानांनी पुनरागमनाचे प्रयत्न केले. मात्र दडपणाखाली ते अपयशी ठरले. ३१व्या मिनिटाला पटणाने दुसरा लोण चढवून ३१-२३ अशा भक्कम आघाडीसह विजय जवळजवळ निश्चित केला. अखेरच्या क्षणी बंगालने पिछाडी कमी केली खरी; मात्र दडपणाखाली चुका झाल्याने पटणाने बाजी मारली.
पटणाकडून रोहितने ११ गुणांसह निर्णायक खेळ केला. तर प्रदीप नरवालने (७) आक्रमण आणि संदीप नरवालने (७) दमदार बचावाद्वारे त्याला साथ दिली. त्याच वेळी यजमान बंगालकडून जँग कून लीने पुन्हा एकदा चमक दाखवताना अष्टपैलू झुंज दिली. त्याने एका सुपर टॅकलसह ९ गुण मिळवले. नितीन तोमरनेही खोलवर चढाया करताना ९ गुणांची वसुली केली.

Web Title: Pirates continued to beat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.