PKL 2019: विराटनं जाहीर केला टीम इंडियाचा कबड्डी संघ!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 03:03 PM2019-07-29T15:03:25+5:302019-07-29T15:06:29+5:30
प्रो- कबड्डी लीगचा यु- मुंबा आणि पुणेरी पलटन यांच्यात झालेला सामना पाहण्यासाठी भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली वरळीच्या एनएससीआय क्रीडा संकुलात शनिवारी उपस्थित होता.
मुंबई: प्रो- कबड्डी लीगचा यु- मुंबा आणि पुणेरी पलटन यांच्यात झालेला सामना पाहण्यासाठी भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली वरळीच्या एनएससीआय क्रीडा संकुलात शनिवारी उपस्थित होता.
यावेळी कोहलीला भारतीय संघातील कोणते खेळाडू कबड्डी खेळू शकतात असे विचारले असता त्याने मात्र स्वता:चे नाव न घेता महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जाडेजा, केएल राहुल, उमेश यादव आणि ऋषभ पंतचे देखील नाव घेतले.
तसेच बुमराह टो- टच करण्यात कबड्डीच्या टीममध्ये कामाला येऊ शकतो त्यामुळे त्याला देखील भारतीय कबड्डी संघात सामिल करेन असे स्पष्ट केले.
Which of his teammates make it to the skipper's kabaddi 7? 🤔
— ProKabaddi (@ProKabaddi) July 27, 2019
As tough on the mat as he is on the pitch - @imVkohli is a true Pangebaaz as he shows here in this rapid-fire Q&A!
Keep watching #VIVOProKabaddi on Star Sports and Hotstar!#IsseToughKuchNahipic.twitter.com/XyvnNKhvNb
तसेच कबड्डीमध्ये कोणती जोडी कोहली व धोनी सारखी आहे असे विचारल्यावर विराटने राहुल चौधरी आणि अजय ठाकूर या खेळाडूंचे नाव घेत या दोघांमध्ये माझा व धोनी सारखा समन्वय असल्याचे सांगितले.