PKL 2019, U Mumba Schedule: यू मुंबा 2015नंतर पुन्हा जेतेपद पटकावण्यासाठी उत्सुक, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 03:49 PM2019-07-16T15:49:18+5:302019-07-16T15:49:41+5:30
प्रो कबड्डी लीगच्या सातव्या हंगामाला 20 जुलैपासून सुरुवात होणार आहे. तेलुगू टायटन्स आणि यू मुंबा यांच्यात सलामीचा सामना हैदराबाद येथील गचिबोवली स्टेडियमवर होणार आहे.
मुंबई : प्रो कबड्डी लीगच्या सातव्या हंगामाला 20 जुलैपासून सुरुवात होणार आहे. तेलुगू टायटन्स आणि यू मुंबा यांच्यात सलामीचा सामना हैदराबाद येथील गचिबोवली स्टेडियमवर होणार आहे. दुसऱ्या सामन्यात गतविजेता बंगळुरू बुल्स आणि तीन वेळेचा विजेता पाटणा पायरेट्स हे भिडणार आहेत. प्रो कबड्डी लीगमधील थरार कायम राखण्यासाठी यंदा फॉरमॅटमध्ये बदल करण्यात येणार असल्याचे आज जाहीर करण्यात आले. लीगचा अंतिम सामना 19 ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे. मराठमोळा सिद्धार्थ देसाई यंदा तेलुगू टायटन्सकडून खेळणार आहे आणि सलामीलाच सिद्धार्थ विरुद्ध यू मुंबा असा सामना पाहायला मिळेल.
Our coaches Sanjeev Baliyan & Upendra Singh are the guiding force for #Mumboys.#GuruPurnima#गुरुपूर्णिमा#HowsTheJoshpic.twitter.com/lUa1woeguu
— U Mumba (@U_Mumba) July 16, 2019
यू मुंबाने 2015 साली प्रो कबड्डीचा किताब पटकावला होता. अंतिम सामन्यात यू मुंबाने 36-30 अशा फरकाने बंगळुरू बुल्सला पराभूत केले होते. त्यानंतर पुढील मोसमात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. पाटणा पाटरेट्सविरुद्ध झालेल्या या चुरशीच्या सामन्यात यू मुंबाला 31-28 असा पराभव पत्करावा लागला होता.
6 days to go for the #VivoProKabaddi to begin and the Mumboys are training at the gym. Here are some photos from their workout session at the @GoldsGymIndia.#HowsTheJosh#MeMumbapic.twitter.com/NjdddMMcoU
— U Mumba (@U_Mumba) July 14, 2019
यू मुंबाचे खेळाडू
- चढाईपटू - अभिषेक सिंग, अर्जुन देश्वास, अतुल एमएस, डाँग जीओन ली, गौरव कुमार, नवनीत, रोहित बलियान, विनोथ कुमार
- बचावपटू - राजगुरु सुब्रमनियम, हर्ष वर्धन, अनील, हरेंद्र कुमार, यंग चँग को, फजल अत्राची, सुरेंद्र सिंग
- अष्टपैलू - अजिंक्य करपे, मोहित बलयान, संदीप नरवाल
यू मुंबाचे सामने
20 जुलै - वि. तेलुगू टायटन्स
22 जुलै - वि. जयपूर पिंक पँथर्स
27 जुलै - वि. पुणेरी पलटन
28 जुलै - वि. बंगळुरू बुल्स
31 जुलै - वि. यूपी योद्धा
2 ऑगस्ट - वि. गुजरात सुपरजायंट्स
9 ऑगस्ट - वि. बंगाल वॉरियर्स
16 ऑगस्ट - वि. पाटणा पायरेट्स
19 ऑगस्ट - वि. हरयाणा स्टीलर्स
23 ऑगस्ट - वि. तमीळ थलायवाज
28 ऑगस्ट - वि. दबंग दिल्ली
31 ऑगस्ट - वि. जयपूर पिंक पँथर्स
5 सप्टेंबर - वि. पुणेरी पलटन
11 सप्टेंबर - वि. बंगाल वॉरियर्स
13 सप्टेंबर - वि. तेलुगू टायटन्स
18 सप्टेंबर - वि. यूपी योद्धा
22 सप्टेंबर - वि. गुजरात फॉर्च्युनजायंट्स
27 सप्टेंबर - बंगळुरु बुल्स
30 सप्टेंबर - वि. तमीळ थलायव्हाज
2 ऑक्टोबर - वि. पाटणा पायरेट्स
10 ऑक्टोबर - वि. हरयाणा स्टीलर्स
11 ऑक्टोबर - वि. दिल्ली दबंग
🗣️ Mumbai waalon! #VIVOProkabaddi Season 7 is heading your way come 20th July! Be sure to take note of the fixtures and turn up in large numbers to support the #Mumboys.
— ProKabaddi (@ProKabaddi) July 14, 2019
And watch it all LIVE on Star Sports and Hotstar.#IsseToughKuchNahipic.twitter.com/fEhygr3C2F