PKL 2024 : १८ तारखेपासून प्रो कबड्डी लीगचा थरार; तीन शहरांमध्ये खेळवले जाणार सामने

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 07:12 PM2024-09-03T19:12:48+5:302024-09-03T19:13:00+5:30

प्रो कबड्डी लीगच्या अकराव्या हंगामाची सुरुवात येत्या १८ ऑक्टोबरपासून होणार आहे.

PKL 2024 Thrill of Pro Kabaddi League from 18th october Matches to be played in three cities | PKL 2024 : १८ तारखेपासून प्रो कबड्डी लीगचा थरार; तीन शहरांमध्ये खेळवले जाणार सामने

PKL 2024 : १८ तारखेपासून प्रो कबड्डी लीगचा थरार; तीन शहरांमध्ये खेळवले जाणार सामने

प्रो कबड्डी लीगच्या अकराव्या हंगामाची सुरुवात येत्या १८ ऑक्टोबरपासून होणार आहे. अलीकडेच पार पडलेल्या लिलावात खेळाडूंवर ऐतिहासिक बोली लागली. प्रथमच एका लिलावात आठ खेळाडूंनी १ कोटींहून अधिकची कमाई केली. याआधीच्या पर्वात प्रो कबड्डी लीगने यशस्वीरीत्या आपली दहा वर्षे पूर्ण केली. अकराव्या हंगामातील सामने पुन्हा एकदा तीन वेगवेगळ्या शहरांमध्ये आयोजित करण्यात येणार आहेत. यंदाच्या पर्वाची सुरुवात हैदराबाद येथील गच्चीबाउली स्टेडियम येथून १८ ऑक्टोबरपासून होणार असून त्यानंतर या लीगचा दुसरा टप्पा नोएडा येथील नोएडा इंडोर स्टेडियम येथे १० नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. तर, तिसरा टप्पा पुणे येथे बालेवाडी बॅडमिंटन स्टेडियम या ठिकाणी ३ डिसेंबर २०२४ पासून रंगणार आहे. खरे तर प्ले ऑफच्या सामन्यांच्या तारखा आणि ठिकाण जाहीर केले जाईल.

दरम्यान, प्रो कबड्डी लीगच्या ११व्या हंगामासाठी १५ आणि १६ ऑगस्ट रोजी मुंबईत लिलाव पार पडला. यामध्ये आठ खेळाडूंना एक कोटीहून अधिक रक्कम मिळाली. हा लीगच्या लिलाव इतिहासातील एक नवा विक्रम ठरला. प्रो कबड्डी लीगच्या ११व्या हंगामाचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्टस नेटवर्कवरून केले जाणार आहे. त्याचबरोबर डिस्ने+ हॉटस्टरवरही चाहत्यांना सामने पाहता येतील. 

डुबकी किंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रदीम नरवालबद्दल वेगळे काही सांगण्याची गरज नाही. पटनाच्या संघाकडून खेळताना त्याने खूप प्रसिद्धी मिळवली. पण, आगामी हंगामात तो बंगळुरु बुल्सकडून खेळताना दिसेल. भारताच्या या स्टार खेळाडूसाठी ७० लाख रुपयांची बोली लागली. सामन्याला एकहाती कलाटणी देण्याची क्षमता असणारा हा खेळाडू कोट्यवधीच्या क्लबला मुकल्याने कबड्डी शौकिनांनाही धक्का बसला. 

Web Title: PKL 2024 Thrill of Pro Kabaddi League from 18th october Matches to be played in three cities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.