५० आॅलिम्पिक पदकांसाठी योजना

By admin | Published: September 22, 2016 05:47 AM2016-09-22T05:47:17+5:302016-09-22T05:47:17+5:30

केंद्र सरकारचे ‘थिंक टँक’ असलेल्या नीती आयोगाने २०२४ च्या आॅलिम्पिकमध्ये किमान ५० पदके जिंकण्यासाठी ठोस योजना आखली आहे.

Plans for 50 Olympic medals | ५० आॅलिम्पिक पदकांसाठी योजना

५० आॅलिम्पिक पदकांसाठी योजना

Next


नवी दिल्ली : केंद्र सरकारचे ‘थिंक टँक’ असलेल्या नीती आयोगाने २०२४च्या आॅलिम्पिकमध्ये किमान ५० पदके जिंकण्यासाठी ठोस योजना आखली आहे. विविध राज्यांत विश्व दर्जाचे प्रतिभावान खेळाडू असताना देखील खेळात चॅम्पियन ठरावेत असे खेळाडू तयार होऊ न शकल्याबद्दल निराशा दर्शवित नीती आयोगाने नव्याने काम सुरू करण्याचे संकेत दिले.
यासाठी प्रत्येक स्तरावर सर्वंकष प्रयत्न केले जातील. कुटुंब, समाज, शाळा, क्षेत्रीय अकादमी, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये क्रीडा आयोजनापासून स्पर्धांच्या दर्जांवर भर देण्यात येणार आहे. अशा प्रयत्नांमधून खेळातील अडथळे दूर होतील, याबद्दल आशावाद देखील व्यक्त करण्यात आला आहे. खेळात करिअर बनविणे व्यक्ती आणि राष्ट्राच्या कसे हिताचे आहे, हे समजावून सांगण्यावर नीती आयोगाचा पुढील काळात भर असेल. (वृत्तसंस्था)

Web Title: Plans for 50 Olympic medals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.