बहिष्कारानंतरही प्लाटिनीची चौकशी
By admin | Published: December 19, 2015 12:19 AM2015-12-19T00:19:38+5:302015-12-19T00:19:38+5:30
विश्व फुटबॉल महासंघाचे(फिफा) उपाध्यक्ष मायकेल प्लाटिनी यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराच्या आरोपांची फिफाच्या नैतिक न्यायालयात शुक्रवारी सुनावणी करण्यात आली. फिफा अधिकाऱ्यांनी
झुरिच : विश्व फुटबॉल महासंघाचे(फिफा) उपाध्यक्ष मायकेल प्लाटिनी यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराच्या आरोपांची फिफाच्या नैतिक न्यायालयात शुक्रवारी सुनावणी करण्यात आली. फिफा अधिकाऱ्यांनी सुनावणी आधीच निकाल सांगून टाकल्याचा आरोप करीत प्लाटिनी यांनी बहिष्कार टाकला होता.
फ्रान्सचे माजी महान खेळाडू राहिलेले प्लाटिनी यांच्या वकिलांनी फिफाच्या चौकशी पथकापुढे प्लाटिनी यांची बाजू मांडली. आठ तास चाललेल्या चौकशीदरम्यान फिफाचे निलंबित अध्यक्ष सॅप
ब्लाटर यांनी गुरुवारी न्यायाधीशांपुढे २०११ मध्ये प्लाटिनी यांना २० लाख स्विस फ्रँक(२० लाख डॉलर) दिल्याचा इन्कार केला. करार अवैध असल्याचा आणि कुठलाही पुरावा नसल्याचा त्यांनी दावा केला. ब्लाटर आणि प्लाटिनी या दोघांवरही या प्रकरणी आधीच ९० दिवसांच्या निलंबनाची कारवाई झाली आहे. दोघांवर आता आजीवन बंदीची टांगती तलवार आहे. फिफाच्या निकटवर्तीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी दोघांबाबत निर्णय येईल. (वृत्तसंस्था)