‘खेलो इंडिया चॅम्पियन्स’ राष्ट्रकुल पदार्पणास सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 06:05 AM2018-04-01T06:05:45+5:302018-04-01T06:05:45+5:30

युवा खेळाडू मनू भाखर आणि श्रीहरी नटराजन हे आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदार्पण करण्यास सज्ज असून, देशासाठी पदक जिंकण्याचा निर्धारही या खेळाडूंनी व्यक्त केला. केंद्र शासनाच्यावतीने नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेतून हे खेळाडू चॅम्पियन होऊन बाहेर आले, हे विशेष.

 'Play India Champions' is preparing for the Commonwealth Games | ‘खेलो इंडिया चॅम्पियन्स’ राष्ट्रकुल पदार्पणास सज्ज

‘खेलो इंडिया चॅम्पियन्स’ राष्ट्रकुल पदार्पणास सज्ज

Next

नवी दिल्ली : युवा खेळाडू मनू भाखर आणि श्रीहरी नटराजन हे आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदार्पण करण्यास सज्ज असून, देशासाठी पदक जिंकण्याचा निर्धारही या खेळाडूंनी व्यक्त केला. केंद्र शासनाच्यावतीने नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेतून हे खेळाडू चॅम्पियन होऊन बाहेर आले, हे विशेष.
मनूने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात २४१.१ गुण संपादन करीत सुवर्ण पदक जिंकले आहे. याआधी डिसेंबरमध्ये तिने राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत २४०.५ गुणांसह राष्ट्रीय विक्रम मोडला होता.
जलतरणपटू श्रीहरीने खेलो इंडिया स्पर्धेत १०० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात राष्टÑीय विक्रम मोडताना सहा सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकले होते. दोन वर्षांचा असताना जलतरणाला सुरुवात करणारा श्रीहरी म्हणाला, खेलो इंडियातील सहभाग राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेचा सराव होता.
मनूच्या नेमबाजी खेळाला तर दोन वर्षांआधीच सुरुवात झाली. स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावरील सातत्यपूर्ण कामगिरीच्या बळावर ती विश्व स्पर्धांमध्ये पदक विजेती कामगिरी करण्यात यशस्वी ठरली आहे. मेक्सिकोत झालेल्या सिनियर विश्वचषकात दोन सुवर्ण आणि आयएसएसएफ विश्वचषकात तीन सुवर्ण जिंकल्यामुळे मनूकडे राष्टÑकुलची संभाव्य पदक विजेती म्हणून पाहिले जात आहे. श्रीहरी राष्टÑकुलच्या ५०, १०० आणि २०० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात सहभागी होणार आहे. जलतरणात तो प्रशांत करमाकरच्या सोबतीने सहभागी होणार आहे.

- सौरव घोषाल आणि दीपिका पल्लीकल कार्तिक यांच्या नेतृत्वात नऊ सदस्यांचा भारतीय स्क्वॅश संघ शनिवारी राष्टÑकुल स्पर्धेसाठी गोल्ड कोस्टकडे रवाना झाला. या संघात हरिंदरपाल संधू, विक्रम मल्होत्रा, रमित टंडन, ज्योत्स्ना चिनप्पा यांच्यासोबत कोच सायरस पोंचा, भुवनेश्वरी कुमारी, फिजिओ ग्री एडवर्डस् (इंग्लंड) यांचा समावेश आहे. ज्योस्त्ना- दीपिका यांनी २०१४ च्या ग्लास्गो राष्टÑकुलमध्ये महिला दुहेरीचे सुवर्ण पदक जिंकले होते.

Web Title:  'Play India Champions' is preparing for the Commonwealth Games

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा