हार्दिकसारखा खेळाडू शोधूनही सापडणार नाही - विराट
By Admin | Published: June 7, 2017 10:28 PM2017-06-07T22:28:34+5:302017-06-07T23:11:19+5:30
भारताच्या या युवा क्रिकेटपटूवर खुद्द कर्णधार विराट कोहलीसुद्धा फिदा झाला आहे. त्याच्यासारखा सारखा खेळाडू शोधूनही सापडणार नाही
>ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 7 - आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत सलग तीन चेंडूवर तीन षटकार मारत हार्दिक पांड्याने सर्वाची वाहवा मिळवली होती. भारताच्या या युवा अष्टपैलू क्रिकेटपटूवर खुद्द कर्णधार विराट कोहलीसुद्धा फिदा झाला आहे. हार्दिकसारखा खेळाडू शोधूनही सापडणार नाही, अशा शब्दात विराटने हार्दिकचे कौतुक केले आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉ़फीच्या गटसाखळीत उद्या महत्त्वपूर्ण सामना होणार आहे. या सामन्याच्या पूर्वसंध्येला प्रसारमाध्यमांशी बोलताना विराटने हार्दिकची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. विराट म्हणाला, "हार्दिक ही भारतीय क्रिकेटला मिळालेली अनमोल देणगी आहे. 140 किमी वेगाने गोलंदाजी आणि तेवढीच आक्रमक फलंदाजी करू शकेल, असा खेळाडू शोधणे कठीण आहे असेच मी म्हणेन. तसेच तो डावाच्या मध्यावरही फलंदाजीही करू शकतो."
बांगलादेशविरुद्ध झालेल्या सराव सामन्यात पांड्याने 54 चेंडूत नाबाद 80 धावांची खेळी केली होती. त्याबाबत कोहली म्हणतो, बांगलादेशच्या सामन्यात तुम्ही हार्दिकमधील गुणवत्ता पाहिलीच आहे, त्याला जर 16 ते 17 षटके मिळाली तर तो मोठी खेळी करू शकतो."