प्रेक्षंकातून फेकलेला चेंडू लागला खेळाडूला
By admin | Published: January 19, 2017 07:03 PM2017-01-19T19:03:25+5:302017-01-19T19:03:25+5:30
कटक येथील दुसऱ्या सामन्यात 47 व्या षटकातील तिसरा चेंडू हार्दिक पांड्याने प्रेक्षंकात भिरकावला. हा षटकार अडविण्यासाठी बेन स्ट्रोकने उंच उडी मारली.
Next
ऑनलाइन लोकमत
कटक, दि. 19 - कटक येथील दुसऱ्या सामन्यात 47 व्या षटकातील तिसरा चेंडू हार्दिक पांड्याने प्रेक्षंकात भिरकावला. हा षटकार अडविण्यासाठी बेन स्ट्रोकने उंच उडी मारली. त्यावेळी त्याचा तोल जाऊन तो जाहिरात बोर्डला जाऊन धडकला. तो चेंडू घेण्यासाठी गेला त्यावेळी प्रेक्षकांनी फेकलेला चेंडू थेट त्याच्या तोंडावर लागला. त्यानंतर बेन स्ट्रोक प्रेक्षकांवर चागंलाच भडकला.
स्ट्रोक सावरत नाही तोपर्यंत प्रेक्षकांकडे गेलेला चेंडू त्यांनी स्ट्रोकच्या दिशेने फेकला. तो सरळ स्ट्रोकच्या तोंडावर बसला. स्ट्रोक बेसावध असल्याने त्याला काहीच समजले नाही. त्याला लक्षात आले तेव्हा तो जबरदस्त भडकला. त्याने प्रेक्षकांना पाहून बडबड केली. पण कोणी चेंडू त्याने मारला हे समजले नाही.
दुसऱ्या सामन्यामध्ये भारताने इंग्लंडसमोर 382 धावांचे आव्हान दिले आहे. दुसऱ्या वनडेमध्ये भारतीय संघाने शेवटच्या 10 षटकांत 120 धावा वसूल केल्या. इंग्लडकडून ख्रिस वोक्सने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना भारतीय संघाची आघाडीची फळी उध्वस्त केली होती. सुरुवातीचे तीन धक्के त्याने दिले होते. दुसऱ्या सामन्यात वोक्सने दहा षटकात चार बळी घेतले आहेत.