खेळाडूंना येताहेत ‘अच्छे दिन’; साहित्यासाठी शासनाकडून मिळतेय मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 01:15 AM2020-02-02T01:15:04+5:302020-02-02T01:15:26+5:30
- पंकज रोडेकर । खेलो इंडिया या स्पर्धेत महाराष्ट्र संघातून खेळताना ठाणे जिल्ह्यातील खेळांडूनी वैयक्तिक असो वा सांघिक खेळात सर्वोत्तम ...
- पंकज रोडेकर ।
खेलो इंडिया या स्पर्धेत महाराष्ट्र संघातून खेळताना ठाणे जिल्ह्यातील खेळांडूनी वैयक्तिक असो वा सांघिक खेळात सर्वोत्तम कामगिरी करून पदकांची लयलूट केली. त्यानिमित्त ठाणे जिल्ह्यातील खेळांडूच्या वतीने ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी स्रेहल साळुंखे-कुदळे यांच्याशी साधलेला संवाद...
खेलो इंडियामध्ये ठाण्याचे किती योगदान होते ?
खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्र संघातून ठाणे जिल्ह्यातील विविध खेळाडूंनी वैयक्तिक आणि सांघिक खेळ-खेळताना आपले विशेष योगदान दिले आहे. नुकतीच ही स्पर्धा वेगवेगळ्या प्रकारांत पार पडली आहे. त्यात इतर जिल्ह्यांपाठोपाठ ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंनी दमदार खेळ करून महाराष्ट्राचा दरारा दाखवून दिला आहे.
खेलो इंडियामधील पदकविजेत्यांचा सत्कार झाला का ?
मुळात ही स्पर्धा २६ जानेवारी रोजी खºया अर्थाने संपली आहे. त्यामुळे या स्पर्धेतील पदके जिंकणाºया खेळाडूंचा सत्कार ठाण्यात झालेला नाही. त्या खेळाडूंच्या सत्काराबाबत क्रीडा विभागाकडून कळवल्यावर त्यानुसार, त्यांचा सत्कार केला जाईल. गतवर्षी खेलो इंडिया ही स्पर्धा बालेवाडीत झाल्याने त्यावेळी जिल्हाधिकाºयांच्या हस्ते विजेत्यांचा सत्कार केला होता.
भविष्यात खेळांबाबत काही विशेष नियोजन आहे का?
विशेष असे काही नियोजन नाही. पण, पाच टक्के कोट्यातून खेळाडूंसाठी नोकरीमध्ये आरक्षण आहे. त्यातच, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या गुणामध्ये वाढ होत आहे. तर ग्रामपंचायत स्तरावर व्यायामशाळा सुरू करणाºया संस्थांना शासन साहित्यासाठी सात लाख देते. तर, खेळाडूंना शिष्यवृत्तीस्वरूपात पाच हजार, १० हजार अशी रक्कमही मिळत आहे.
ठाणे जिल्ह्यात मैदाने कमी होत आहेत?
ठाण्यात तशी परिस्थिती नाही. परंतु, मुंबईत आहे. क ल्याण आणि त्याच्या पुढील पट्ट्यात कबड्डी, खो-खो हे खेळ खेळले जात आहेत. उल्हासनगर येथे नेमबाजी, ठाण्यात व इतर ठिकाणी जलतरण, पॉवरलिफ्टिंग हे खेळ शालेयस्तरावर खेळले जात आहेत. त्यातून नवीन खेळाडू निश्चितच घडतील.
खेळांमध्ये करिअर आहे का ?
मी स्वत: खेळाडू आहे. खेळातून मी या पदापर्यंत पोहोचले आहे. सद्य:स्थितीत खेळ कमी झाले आहे. त्यातच, पालकवर्ग खेळांमध्ये नोकरी नाही, करिअर नाही असे म्हणतात. मात्र, खेळांना आता चांगले दिवस येत आहेत. खेळाकडे १०० टक्के वेळ दिला नाहीतर किमान ७५ टक्के तो दिल्यास नक्की चांगले दिवस येतील. त्यातून करिअरही घडू शकेल. जसे आयपीएल आणि प्रो-कबड्डी स्पर्धा यांचे उदाहरण देता येईल.