खेळाडूंना कोठेही खेळण्याचा अधिकार : साक्षी

By admin | Published: October 8, 2016 03:43 AM2016-10-08T03:43:50+5:302016-10-08T03:43:50+5:30

साक्षी मलिक हिने खेळाडूंना जगातील कोणत्याही कोपऱ्यात आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूविरुद्ध खेळण्याचा अधिकार असल्याचे सांगितले.

Players have the right to play: Witness | खेळाडूंना कोठेही खेळण्याचा अधिकार : साक्षी

खेळाडूंना कोठेही खेळण्याचा अधिकार : साक्षी

Next


बंगळुरू : राजकीय तणावादरम्यान भारतात पाकिस्तानी खेळाडूंना खेळण्यास मान्यता देण्याविषयीच्या वादाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न करताना आॅलिम्पिक कांस्यपदकविजेती साक्षी मलिक हिने खेळाडूंना जगातील कोणत्याही कोपऱ्यात आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूविरुद्ध खेळण्याचा अधिकार असल्याचे सांगितले.
पाकिस्तानी खेळडूंना विविध आंतरराष्ट्रीय खेळांच्या स्पर्धेत खेळण्यास आमंत्रित करायला हवे, असे मी म्हटल्याचे आज सकाळी मीडियात दाखविले जात होते. तथापि, मी असे काहीही म्हटले नाही, असे साक्षीने सांगितले. उरी हल्ल्यानंतर भारतीय सरकारच्या लक्ष्यित हल्ल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंवर भारतात खेळण्याच्या बंदीविषयी विचारलेल्या प्रश्नावर साक्षीची प्रतिक्रिया मागण्यात आली होती.(वृत्तसंस्था)
याविषयी साक्षीने स्पष्टीकरण देताना म्हटले, की तिने ‘खेळाडूंना जगात कोठेही खेळण्याचा अधिकार आहे,’ एवढेच म्हटले होते. ती म्हणाली, ‘‘मी पाकिस्तानी खेळाडूंना भारतात खेळण्यास मान्यता देण्याविषयी वकिली केली नव्हती. खेळाडूंना सर्वच अधिकार आहे. जसे की, आम्ही स्पर्धेत (आॅलिम्पिक) सहभागी होणे आणि आम्ही अन्य खेळाडूंविरुद्ध खेळतो, जे विविध देशांचे असतात.’’

Web Title: Players have the right to play: Witness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.