खेळाडूंना भासत आहे वॉल्शची उणीव
By Admin | Published: November 29, 2014 01:09 AM2014-11-29T01:09:31+5:302014-11-29T01:09:31+5:30
भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक टेरी वॉल्श यांनी राजीनामा दिल्यामुळे खेळाडूंना धक्का बसला असून चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत खेळाडूंना त्यांची उणीव भासणार आहे.
नवी दिल्ली : भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक टेरी वॉल्श यांनी राजीनामा दिल्यामुळे खेळाडूंना धक्का बसला असून चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत खेळाडूंना त्यांची उणीव भासणार आहे.
खेळाडूंनी प्रशिक्षकांची प्रशंसा केली, पण त्यांच्या राजीनामा देण्याच्या घटनेचा भुवनेश्वर येथे 6 ते 14 डिसेंबर या कालावधीत होणा:य चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील कामगिरीवर प्रभाव पडणार नसल्याचे खेळाडूंनी स्पष्ट केले.
स्ट्रायकर रमणदीप सिंग म्हणाला,‘वॉल्श चांगले प्रशिक्षक होते. संघाच्या अलीकडच्या कालावधीतील कामगिरीवरून त्याची प्रचिती येते. वॉल्श व रोलेंट ओल्टमेन्स यांची जोडी चांगली होती.
वॉल्श मायदेशी परतले असले तरी संघाचे मनोधैर्य ढासळलेले नसल्याचे सरदार सिंगने म्हटले आहे. आम्ही सध्या सरावामध्ये व्यस्त असून वृत्तपत्र वाचणासाठी वेळ मिळत नाही. आम्ही कामगिरीत सुधारणा करण्यास प्रयत्नशील आहोत, असेही सरदार
सिंग म्हणाला.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताला सलामी लढतीत जर्मनीच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. यजमान संघ आशियाई स्पर्धा व ऑस्ट्रेलिया दौ:यातील कामगिरीत सातत्य राखण्यास प्रयत्नशील असल्याचे कर्णधार सरदार सिंगने स्पष्ट
केले. (वृत्तसंस्था)
आठ संघांचा समावेश
नऊ दिवस चालणा:या चॅम्पियन्स लीग हॉकी चषकात जगातील अव्वल आठ देश सहभागी होणार आहेत. अर्जेटिना, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, बेल्जियम, जर्मनी, भारत, नेदरलॅँड आणि पाकिस्तान हे
संघ विजेतेपदासाठी एकमेकांविरुद्ध झुंज देतील.