बास्केटबॉल लीगसाठी खेळाडूंची नावे जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 04:49 IST2018-06-18T04:49:44+5:302018-06-18T04:49:44+5:30
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल महासंघाच्या (फिबा) मान्यतेने भारतात सुरु होत असलेल्या प्रो बास्केटबॉल लीगसाठी (३बीएल) खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली.

बास्केटबॉल लीगसाठी खेळाडूंची नावे जाहीर
मुंबई : आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल महासंघाच्या (फिबा) मान्यतेने भारतात सुरु होत असलेल्या प्रो बास्केटबॉल लीगसाठी (३बीएल) खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली. या लीगसाठी घेण्यात आलेल्या सराव सामन्यातून आणखी १५ भारतीयांची निवड करण्यात आली आहे.
या स्पर्धेसाठी घेण्यात आलेल्या पहिल्या निवड चाचणीतून देशभरातून १०० खेळाडूंची निवड करण्यात आली होती. या पहिल्या वहिल्या बास्केटबॉल लीगसाठी दिल्ली, पंजाब, कर्नाटक, तामिळनाडू आणि महाराष्ट्र येथील युवा खेळाडूंनी सहभाग घेतला होता. निवडचाचणी दरम्यान पलप्रीत सिंग ब्रार, इंदरबीर गिल, गुरविंदर सिंग आणि जगदीप सिंग या अनुभवी भारतीय खेळाडूंनी उपस्थित राहून युवा खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावला.