खेळाडूंच्या वेतनाची रक्कम सार्वजनिक होणार
By admin | Published: December 18, 2015 03:17 AM2015-12-18T03:17:26+5:302015-12-18T03:17:26+5:30
कामात पारदर्शीपणा आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या बीसीसीआयने आयपीएलमधील रिटेन खेळाडूंना मिळणाऱ्या वेतनाची रक्कम सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून
नवी दिल्ली : कामात पारदर्शीपणा आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या बीसीसीआयने आयपीएलमधील रिटेन खेळाडूंना मिळणाऱ्या वेतनाची रक्कम सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून फॅ्रन्चायसींमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटली.
आयपीएल अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी नवी फ्रॅन्चायसी पुणे आणि राजकोट यांच्यासाठी रिटेन करण्यात आलेल्या खेळाडूंना मिळणाऱ्या रकमेची माहिती बीसीसीआय वेबसाईटवर टाकण्याची घोषणा केली. ही माहिती ३१ डिसेंबरपर्यंत पहिली ट्रेडिंग विंडो संपताच उपलब्ध होईल. यामुळे रिटेन करण्यात आलेल्या खेळाडूंचे मूळ वेतन सार्वजनिक होणार आहे.
फ्रॅन्चायसींच्या मते रिटेनर खेळाडूला काय मिळाले, हे जाणून घेण्याची कुणाला गरज नसते त्यामुळे रक्कम सार्वजनिक करणे योग्य नाही. अन्य खेळाडूंना हे माहिती झाले तर करारात खेळाडू उणिवा शोधतात. करारावर सह्या करण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे संघात खदखद शिजते. काही विदेशी खेळाडू हे
रिटेन करण्यात आलेल्या भारतीय खेळाडूंच्या तुलनेत सरस ठरतात, तेव्हा आपल्याला कामगिरीनुरुप किंमत मिळाली नसल्याची भावना त्यांच्यात वाढीस लागते. आयपीएलमध्ये काही असेही खेळाडू आहेत, की ज्यांना मोठ्या रकमा दिल्या जातात पण
ती रक्कम खात्यात जमा केली
जात नसल्याची चर्चा आहे. पण या गोष्टीला अधिकृत दुजोरा अद्यापही मिळालेला नाही. (वृत्तसंस्था)
फ्रॅन्चायसीच्या एकूण रकमेतून १२.५० कोटी कमी होतील
फ्रॅन्चायसी संघ लिलावापूर्वी आपल्या संघात काही खेळाडू रिटेन करू शकतात. या खेळाडूंची किंमत इतरांच्या तुलनेत वेगळी असते. उदाहरण द्यायचे झाल्यास रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विराट कोहलीला रिटेन खेळाडू म्हणून घेत असेल तर फॅन्चायसीच्या एकूण रकमेतून १२.५० कोटी कमी होतील. पण फ्रॅन्चायसी विराटला यापेक्षा अधिक किंवा अधिक रक्कम देऊ शकते. रिटेन करण्यात आलेल्या खेळाडूंची खरी कमाई सर्वसाधारण जनतेला कधीच माहिती नसते. पण जे खेळाडू लिलावास उपलब्ध असतात. त्यांच्यावर बोली लागल्याने त्यांची रक्कम मात्र जनतेला माहिती होते.