ड्रेसिंगरुममधील कुंबळेंच्या "दादागिरीने" हैराण होते खेळाडू

By admin | Published: June 24, 2017 12:00 PM2017-06-24T12:00:00+5:302017-06-24T12:00:00+5:30

भारताचे माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदावरुन पायउतार झाल्यापासून भारतीय क्रिकेटमध्ये नव्या वादळाची सुरुवात झाली आहे.

The players who had Kumble in "Dadaagiri" | ड्रेसिंगरुममधील कुंबळेंच्या "दादागिरीने" हैराण होते खेळाडू

ड्रेसिंगरुममधील कुंबळेंच्या "दादागिरीने" हैराण होते खेळाडू

Next

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 24 - भारताचे माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदावरुन पायउतार झाल्यापासून भारतीय क्रिकेटमध्ये नव्या वादळाची सुरुवात झाली आहे. कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली यांच्यातील कथित वादाबद्दल रोज नवनवीन धक्कादायक बातम्या समोर येत आहेत. आतापर्यंत या संपूर्ण वादामध्ये ज्या गोष्टी समोर आल्यात त्यामध्ये कुंबळे नायक तर, कोहली खलनायक ठरला आहे. अनिल कुंबळे चांगले प्रशिक्षक होते तर, टीम इंडियाचे सिनियर खेळाडू बेशिस्त आहेत अशी प्रतिमा माध्यमांनी तयार केली आहे. 
 
पण आता खेळाडूंची बाजू सुद्धा समोर आली आहे. अनिल कुंबळे यांचा ड्रेसिंगरुममध्ये वर्चस्व, अधिकारशाही गाजवण्याचा स्वभाग खेळाडूंना खटकत होता. संघ निवडीवरुन त्यांच्यात आणि कोहलीमध्ये मतभेद व्हायचे असे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने टीम इंडियाच्या जवळच्या सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. प्रत्येक कर्णधाराला आपल्या पसंतीचा संघ हवा असतो. सौरव, राहुल, धोनी आणि आता विराटही त्याला अपवाद नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणा-या क्रिकेटपटूला कसे हाताळण्याचे त्याचे कौशल्य प्रशिक्षकाकडे असावे लागते. 

आणखी वाचा 
मी नेहमीच ड्रेसिंग रुममधील पावित्र्य राखलं, विराट कोहलीचा कुंबळेवर निशाणा
गॅरन्टी द्या, तरच प्रशिक्षकपदासाठी अर्ज करतो - रवी शास्त्री
"लोकमत"च्या पोलमध्ये कुंबळेसमोर कोहलीचा "विराट" पराभव
 
पण खेळाडूंशी संवाद साधताना कुंबळे यांच्यातला कठोर प्रशिक्षक जागा व्हायचा. कुंबळे यांची खेळाडूंना हाताळण्याची पद्धत कोहलीला अजिबात पटत नव्हती. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरु असताना कोहली आणि क्रिकेट सल्लागार समितीमध्ये चार तासांची बैठक झाली. या बैठकीत कोहलीने त्याला वाटणा-या चिंता, कुंबळे यांचे काय चुकतेय ते सर्व त्याने सल्लागार समितीला सांगितले. 
कुंबळे यांची एकधिकारशाही संघातील अनेक खेळाडूंना खटकत होती. आयपीएलमध्ये त्यांच्यासोबत काम केलेल्या काही खेळाडूंनी कुंबळेंशी जुळवून घेणे कठिण असल्याचे म्हटले होते. मागच्यावर्षी वेस्ट इंडिज दौ-यापासून कुंबळे आणि कोहली यांच्यात मतभेदाला सुरुवात झाली. आपण नाही समोरचा चुकतोय या विचारसरणीमुळे मतभेद जास्त वाढले. 
 
या संपूर्ण वादात फक्त कोहलीला दोष देऊन चालणार नाही कारण आज सल्लागार समितीमध्ये असलेल्या सचिन, सौरव त्यांनी 2007 वर्ल्डकप पराभवानंतर ग्रेग चॅपल यांना प्रशिक्षकपदावरुन हटवण्यासाठी अशाच प्रकारचे प्रयत्न केले होते. 
 

Web Title: The players who had Kumble in "Dadaagiri"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.