पॅरालिम्पिक चॅम्पियनसाठी कायपण! चक्क जमिनीवर मांडी घालून बसले PM मोदीजी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 08:41 PM2024-09-12T20:41:50+5:302024-09-12T20:44:42+5:30
PM मोदी आणि पॅरालिम्पियन खेळाडू यांच्यातील ग्रेट भेटीच्या दरम्यान अनेक वेगवेगळे पैलू पाहायला मिळाले.
पॅरिस येथील पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी नवा इतिहास रचला. आतापर्यंतच्या इतिहासात जे घडलं नाही तो सीन पाहायला मिळाला. भारताने पॅरीसमध्ये सर्वाधिक २९ पदकं जिंकली. टोकियो पॅरालिम्पिकचा रेकॉर्ड मागे टाकत भारताच्या नावे आता या स्पर्धेतील नव्या विक्रमाची नोंद झाली आहे.
पॅरालिम्पियन खेळाडूंसोबत PM मोदींच्या दिलखुलास गप्पा गोष्टी
खेल और हमारे खिलाड़ियों के 'परम मित्र' यशस्वी प्रधानमंत्री श्री @narendramodi जी का पैरा एथलीट्स के साथ इस रोचक संवाद का हम सबको इंतजार है.... pic.twitter.com/gWJ93NjX1f
— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) September 12, 2024
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत दमदार कामगिरी करून मायदेशी परतलेल्या खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. परंपरेनुसार जगाच्या मानाच्या स्पर्धेतून परतलेल्या खेळाडूंसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीचा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गुरुवारी १२ सप्टेंबर रोजी पंतप्रधानांच्या निवासस्थानी ऑलिम्पिकमधील खेळाडूंप्रमाणेच पॅरालिम्पिक स्पर्धा गाजवणाऱ्या खेळाडूंचही अगदी थाटात स्वागत करण्यात आले. यावेळी मोदींनी खेळाडूंशी अगदी दिलखुलास गप्पा गोष्टी केल्याचे पाहायला मिळाले.
भारताचा पॅरालिम्पिकमधील गोल्डन बॉय अन् नरेंद्र मोदीजी यांच्यातील भेटीचा क्षण चर्चेत
PM मोदी आणि पॅरालिम्पियन खेळाडू यांच्यातील ग्रेट भेटीच्या दरम्यान अनेक वेगवेगळे पैलू पाहायला मिळाले. त्यात भारताचा गोल्डन बॉय नवदीप सिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीचा क्षण लक्षवेधून घेणारा असा होता. ज्याची सोशल मीडियावरही सध्या जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.
भारताचा गोल्डन बॉय अन् PM मोदी यांच्यातील तो खास क्षण
माननीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी का स्नेह और सादगी pic.twitter.com/CKIX44aQQl
— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) September 12, 2024
जो व्हिडि व्हायरल होताना दिसतोय त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे साधेपण आणि त्यांनी पॅरालिम्पिक गोल्डन बॉयला दिलेला मान या गोष्टीची खास झलक पाहायला मिळते. नवदीप हा PM मोदींसाठी एक खास कॅप घेऊन आला होता. त्याचे हे खास गिफ्ट स्विकारताना मोदीजींनी साधेपणा जपत पॅरालिम्पिक चॅम्पियनसाठी कायपण हा सीन दाखवून दिला. ते थेट जमिनीवर बसले. मग नवदीपनं त्यांना टोपी घातली. त्यानंतर पंतप्रधान मोदीजी यांनी नवदीपला स्वाक्षरीही दिल्याचे पाहायला मिळाले. पॅरिस पॅरालिम्पिकमधील भालाफेक इवेंटमधील गोल्डन बॉय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील हा सीन सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरताना दिसतोय.