नवदीपसाठी पंतप्रधान मोदी जमिनीवर बसले अन् गमतीशीर प्रश्न विचारले, VIDEO व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 01:00 AM2024-09-13T01:00:16+5:302024-09-13T01:01:16+5:30

भालाफेकीत सुवर्णपदक जिंकणारा नवदीप सिंग थ्रो फेकल्यानंतर अत्यंत आक्रमक अंदाजात दिसला होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी नवदीपला त्याच्या रागाचे कारणही विचारले.

PM Modi sits on floor for Navdeep singh and asks funny questions, VIDEO goes viral | नवदीपसाठी पंतप्रधान मोदी जमिनीवर बसले अन् गमतीशीर प्रश्न विचारले, VIDEO व्हायरल

नवदीपसाठी पंतप्रधान मोदी जमिनीवर बसले अन् गमतीशीर प्रश्न विचारले, VIDEO व्हायरल

पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी मोठ्या प्रमाणावर पदकं जिंकून पॅरिसमध्ये देशाचा ध्वज फडकावला. पदक जिंकून परतलेल्या खेळाडूंचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. यांपैकी एक नाव म्हणजे नवदीप सिंग. नवदीप सिंगला ज्युनियर गोल्डन बॉय म्हटल्यास अतिशोक्ती होणार नाही. कारण त्याने मेहनत आणि समर्पणाच्या बळावर नशिबालाही झुकायला भाग पाडले आहे. भालाफेकीत सुवर्णपदक जिंकणारा नवदीप सिंग थ्रो फेकल्यानंतर अत्यंत आक्रमक अंदाजात दिसला होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी नवदीपला त्याच्या रागाचे कारणही विचारले.

व्हायरल झाला होता व्हिडिओ -
नवदीप सिंगचा थ्रो फेकल्यानंतरचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला होता. त्याने आक्रमक अंदाजात काही अपशब्दही उच्चारले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साडेचार फूट उंचीच्या नवदीप सिंगचा विशेष सन्मान केला. यावेळी नवदीपने पंतप्रधान मोदींना टोपी घालण्याची विनंती केली. यावर मदी खाली बसले आणि नवदीपने त्यांना टोपी घातली, तसेच आपल्या जर्सीवर त्यांचा ऑटोग्राफही घेतला. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

पंतप्रधानांनी विचारलं रागाचं कारण -
यावेळी नवदीप सिंगच्या व्हायरल व्हिडिओवर पंतप्रधान मोदींनी त्याला विचारले, "नंतर एवढा राग कसा येतो?" यावर बोलताना नवदीप हसला आणि म्हणाला, "सर, गेल्यावेळी मी चौथ्या क्रमांकावर आलो होतो. यावेळी मी आपल्याला वचन दिले होते आणि ते पूर्ण केले (पदक जिंकले)." नवदीप शिवाय पंतप्रधान मोदींनी इतर खेळाडूंनाही सन्मानित केले. खेळ मंत्री मंडाविय यांनी सुवर्णपदक विजेत्यांना 75 लाख रुपये, रौप्यपदक विजेत्यांना 50 लाख रुपये आणि कांस्यपदक विजेत्या खेळाडूंना 30 लाख रुपये दिले. या मेगा इव्हेंटमध्ये भारताना विक्रमी 29 मेडल जिंकले आहेत. यात 7 गोल्ड, 9 सिल्वर आणि 13 ब्रॉन्ज मेडल्सचा समावेश आहे.
 

 

Web Title: PM Modi sits on floor for Navdeep singh and asks funny questions, VIDEO goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.