“मला तुझी एक गोष्ट पटली नाही”; ऑलिम्पिक पदक विजेत्या रवीवर PM मोदी नाराज!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 01:13 PM2021-08-18T13:13:48+5:302021-08-18T13:15:29+5:30

कुस्तीत भारताला रौप्य पदक मिळवून देणाऱ्या कुस्तीपटू रवीकुमार दहिया याच्याकडे नाराजी व्यक्त करत पंतप्रधान मोदी यांनी एक तक्रार केली आहे.

pm narendra modi complaint olympic medal winner ravi kumar dahiya while conversation | “मला तुझी एक गोष्ट पटली नाही”; ऑलिम्पिक पदक विजेत्या रवीवर PM मोदी नाराज!

“मला तुझी एक गोष्ट पटली नाही”; ऑलिम्पिक पदक विजेत्या रवीवर PM मोदी नाराज!

Next

नवी दिल्ली: यंदाच्या टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने सर्वोत्तम कामगिरी करत सर्वाधिक पदक जिंकण्याची दमदार कामगिरी केली आहे. यानंतर ऑलिम्पिकमध्ये झालेल्या खेळाडूंचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त ऑलिम्पिकमधील सर्व सहभागी खेळाडूंना लाल किल्ल्यावरील ध्वजारोहण कार्यक्रमासाठी आमंत्रित करत त्यांचे अभिनंदन केले. यानंतर झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात खेळाडूंशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी कुस्तीत भारताला रौप्य पदक मिळवून देणाऱ्या कुस्तीपटू रवीकुमार दहिया याच्याकडे नाराजी व्यक्त करत पंतप्रधान मोदी यांनी एक तक्रार केली आहे. (pm narendra modi complaint olympic medal winner ravi kumar dahiya while conversation)

पंतप्रधानांन नरेंद्र मोदी यांनी ऑलिम्पिकला जाण्यापूर्वी सर्व खेळाडूंशी संवाद साधला होता. यावेळी खेळाडूंच्या घरची परिस्थिती ते त्यांचा ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास अशा अनेक मनमोकळ्या गप्पा मारल्या होत्या. त्याचवेळी आघाडीची टेनिसपटू पीव्ही सिंधूला ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यानंतर आपण सोबत आईस्क्रीम खाऊ असे वचन दिले होते. सिंधूने तिसऱ्या स्थानाचा सामना जिंकत कांस्य पदकावर नाव कोरले. यानंतर पंतप्रधान मोदींनी दिलेले वचन पाळत तिच्यासोबत स्वांतत्र्य दिनादिवशी आईस्क्रिम खाल्ले. यासह अनेक खेळाडूंशी संवाद साधला. यावेळी पैलवान रवीकुमारकडे मात्र मोदींनी एक तक्रार केली.

मला ऑलिम्पिकमध्ये तुझी एक गोष्ट पटली नाही

रवीशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, मला ऑलिम्पिकमध्ये तुझी एक गोष्ट पटली नाही, त्याचीच तक्रार मी तुझ्याकडे करणार आहे, असे मोदींनी सांगितले. यावर रवीने त्यांना काय तक्रार आहे? असे विचारले. उत्तरात मोदी म्हणाले की, तू हरियाणाचा आहेस आणि मी आतापर्यंत पाहिले आहे त्यानुसार हरियाणावासी प्रत्येक गोष्टीत आपला आनंद शोधतात. ५ वर्ष मी हरियाणामध्ये राहिलो आहे. त्यामुळे ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतरही पोडियमवर खुश दिसत नव्हतास, पंतप्रधान मोदींच्या या तक्रारीनंतर रवीकुमारलाही हसू आले. ज्यानंतर त्याने यापुढे मी हसत राहिन असे वचन मोदींना दिले.

दरम्यान, यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला एकूण सात पदके मिळवण्यात यश आले. यामध्ये भालाफेक खेळात नीरज चोप्राला सुवर्णपदक, वेटलिफ्टर मिराबाई चानू आणि पैलवान रवी दहियाला रौप्य पदक मिळाले. तर बॅडमिंटपटू पीव्ही सिंधू आणि पैलवान बजरंग पूनियासह बॉक्सर लवलीना बोरगोहेनला कांस्य पदक मिळाले. याशिवाय सांघिक खेळात भारतीय पुरुष हॉकी संघाने कांस्य पदकावर नाव कोरले.
 

Web Title: pm narendra modi complaint olympic medal winner ravi kumar dahiya while conversation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.