आईचे कौतुक, दुखापतीबद्दल चौकशी अन्... पंतप्रधान मोदींनी नीरज चोप्राला दिली शाबासकी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 03:30 PM2024-08-09T15:30:59+5:302024-08-09T16:07:34+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नीरज चोप्राशी फोनवर बोलून रौप्यपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे

PM Narendra Modi has congratulated Neeraj Chopra over the phone for winning the silver medal Paris Olympics 2024 | आईचे कौतुक, दुखापतीबद्दल चौकशी अन्... पंतप्रधान मोदींनी नीरज चोप्राला दिली शाबासकी

आईचे कौतुक, दुखापतीबद्दल चौकशी अन्... पंतप्रधान मोदींनी नीरज चोप्राला दिली शाबासकी

Paris Olympics 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याच्याशी फोनवरुन चर्चा केली. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी नीरजचे अभिनंदन केले. नीरज चोप्रा यांच्याकडून दुखापतीबद्दलही पंतप्रधान मोदींनी जाणून घेतले. नीरज चोप्राच्या आईने दाखविलेल्या खेळ भावनेचे पंतप्रधान मोदींनी खूप कौतुक केले. पंतप्रधान मोदींनी निरज चोप्रासोबात फोनवरुन केलेल्या चर्चेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ८९.४५ मीटर दूर भाला फेकून रौप्यपदकाची कमाई केली. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये नीरजने सुवर्णपदक पटकावलं होतं. मात्र यावेळी त्याला रौप्यपदकावरच समाधान मानावं लागलं. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने तब्बल ९२.९७ मीटर दूर भाला भेकून सुवर्णपदक पटकावलं. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील नीरजची पाठ थोपटली. पंतप्रधान मोदी यांनी फोन करु नीरजला शाबासकी दिली आहे.

ऑल्मिपिकमध्ये नीरज चोप्राने भारतासाठी पाचवं पदक जिंकलं आहे. या कामगिरीबद्दल नीरज चोप्राचे देशभरातून कौतुक होत आहे. पंतप्रधान मोदींनी नीरजला त्याच्या दुखापतीबद्दल फोनवरुन विचारले. नीरजने दुखापतीचा सामना करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेत असल्याचे सांगितले होते.

“रौप्यपदक जिंकल्याबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन. तू संपूर्ण देशाला पुन्हा एकदा गौरव प्राप्त करून दिलास. मी रात्री तुझा खेळ पाहत होतो. संबंध देश तुझ्याकडे नजरा लावून होता,”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. यावर नीरज चोप्राने मला दुखापतीने त्रस्त केले. नाहीतर मी सुवर्ण नक्कीच जिंकले असते. दुखापतीमुळे भाला फेकताना मला जास्त ताकद लावता आली नाही, असे म्हटलं. त्यावर पंतप्रधान मोदी तू मला येऊन भेटशील तेव्हा तुझ्या दुखापतीचे काय करायचे? यावर बोलू असं म्हटलं.

नीरज चोप्राच्या आईचे कौतुक

फोनवरुन बोलत असताना पंतप्रधान मोदी यांनी नीरज चोप्राच्या आईच्या खेळ भावनेची पंतप्रधानांनी स्तुती केली. पंतप्रधान मोदींनी नीरजला तुझी आईही खेळाडू होती का? मी तिची मुलाखत सकाळी पाहिली. त्यामध्ये एका खेळाडूप्रमाणे त्यांनी खिलाडू वृत्ती दाखवली. त्यांनी सुवर्णपदक विजेत्या खेळडूलाही स्वतःचा मुलगा असल्याचे संबोधले. हे स्पिरिट खेळाडूच्या घरातच पाहायला मिळू शकते, असेही म्हटलं.

पाकिस्तानचा सुवर्णपदक विजेता अर्शद नदीम आमच्या मुलासारखा असल्याचे नीरजच्या आईने म्हटले होते. नीरजची आई सरोज देवी यांनी, आम्ही खूप आनंदी आहोत. आमच्यासाठी चांदी सोन्याइतकीच आहे. ज्याने सुवर्ण जिंकले (नदीम) तोही आमच्या मुलासारखा आहे" असं म्हटलं होतं.

Web Title: PM Narendra Modi has congratulated Neeraj Chopra over the phone for winning the silver medal Paris Olympics 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.