पोलंड, जर्मनी अंतिम सोळामध्ये

By Admin | Published: June 22, 2016 12:28 AM2016-06-22T00:28:14+5:302016-06-22T00:28:14+5:30

जर्मनी संघाने नॉर्दन आयर्लंड संघाचा तर पोलंड संघाने युक्रेन संघाचा पराभव करून युरो कप फुटबॉल स्पर्धेच्या क गटात अंतिम सोळामध्ये प्रवेश केला.

Poland, Germany in the final sixteen | पोलंड, जर्मनी अंतिम सोळामध्ये

पोलंड, जर्मनी अंतिम सोळामध्ये

googlenewsNext

पॅरिस/मार्सिले : जर्मनी संघाने नॉर्दन आयर्लंड संघाचा तर पोलंड संघाने युक्रेन संघाचा पराभव करून युरो कप फुटबॉल स्पर्धेच्या क गटात अंतिम सोळामध्ये प्रवेश केला.
दोन्ही लढती चुरशीच्या झाल्या. जर्मनी संघाने नॉर्दन आयर्लंड संघाला १-० गोलने पराभूत केले. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ करून एकमेकांविरुद्ध गोल करण्याचे प्रयत्न केले; पण कोणत्याही संघाला यश येत नव्हते. तिसाव्या मिनिटाला जर्मनीच्या गोमेझला मिळालेल्या संधीचा त्याने पूर्ण फायदा घेत आपल्या संघाचा एकमेव गोल नोंदविला. ही १ गोलची आघाडी सामना संपेपर्यंत राहिली.
दुसऱ्या लढतीत पोलंड संघाने युक्रेनला नमवीत अंतिम सोळामधील आपली जागा निश्चित केली. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच नियोजनबद्ध खेळ केला. पोलंडच्या संघाने केलेल्या आक्रमणाचे युक्रेनच्या संघाने सडेतोड उत्तर देऊन परतावून लावले. ५४व्या मिनिटाला पोलंडच्या ब्लाझेझक्वासीने गोल करून आपल्या संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. ब्लाझेझक्वासीला आक्रमण करताना रोकण्याचा प्रयत्न युक्रेनच्या खेळाडूंकडून अनेक वेळा झाला होता. एक गोलची बरोबरी युक्रेनेचे खेळाडू करू शकले नाहीत. (वृत्तसंस्था)

Web Title: Poland, Germany in the final sixteen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.