धक्कादायक : Live मॅचदरम्यान चालल्या गोळ्या, खेळाडूंची पळापळ; एका महिला प्रेक्षकासह तीन जणं जखमी, Video
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 01:50 PM2021-07-18T13:50:57+5:302021-07-18T13:51:27+5:30
प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं स्टेडियम... खेळाडूंना चिअर करण्यासाठी सुरू होता टाळ्यांचा कडकडाट.. दोन्ही संघाचे खेळाडू एकमेकांना हरवण्यासाठी होते प्रयत्नशील... अचानक
प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं स्टेडियम... खेळाडूंना चिअर करण्यासाठी सुरू होता टाळ्यांचा कडकडाट.. दोन्ही संघाचे खेळाडू एकमेकांना हरवण्यासाठी होते प्रयत्नशील... अचानक गोळ्यांचा आवाज आला अन् पळापळ सुरू झाली. अमेरिकेच्या नॅशनल स्टेडियमवर बेसबॉसचा सामना सुरू असताना गोळ्यांच्या अनेक फेऱ्या झाडल्याचा आवाज आला.. खेळाडूंनी त्वरित डगआऊटमध्ये धाव घेतली अन् प्रेक्षकांमध्येही गोंधळ सुरू झाला.
शनिवारी रात्री खेळवण्यात आलेल्या या सामन्यात मध्येच हा फायरिंग झाली. ही फायरिंग स्टेडियमबाहेर झाली, परंतु त्यामुळे स्टेडियमच्या आत भीतीचे वातावरण पसरले.
You can hear the gunshots just as the broadcast cuts away pic.twitter.com/tBmbZaR3GB
— Jack Leonardi (@JackLeonardi) July 18, 2021
BREAKING: Reports of an active shooter outside Nationals Park in Washington DC.
— Alex Salvi (@alexsalvinews) July 18, 2021
Stadium security is telling fans to stay inside the stadium and take cover. pic.twitter.com/b6k8iZ2A9A
Something going on outside @Nationals park causing everyone to freak out in here. pic.twitter.com/obXuaCwMA5
— Justin Beland (@JustinBeland) July 18, 2021
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन गटांमध्ये ही फायरिंग झाली. या फायरिंगमध्ये दोघं जखमी झाले. स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी आलेली एक महिला काही कामासाठी स्टेडियमबाहेर आली आणि तेव्हा तीही जखमी झाली.