राजकीय चर्चा क्रिकेट संबंधांसाठी महत्त्वाची ठरेल
By admin | Published: August 19, 2015 11:07 PM2015-08-19T23:07:40+5:302015-08-19T23:07:40+5:30
पुढील आठवड्यात भारत आणि पाकिस्तानदरम्यान होणारी राजकीय चर्चा दोन्ही देशांमधील क्रिकेट संबंधांमधील सुधारणेसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते,
लाहोर : पुढील आठवड्यात भारत आणि पाकिस्तानदरम्यान होणारी राजकीय चर्चा दोन्ही देशांमधील क्रिकेट संबंधांमधील सुधारणेसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते, असे मत पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष शहरयार खान यांनी व्यक्त केले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीज यांच्या नेतृत्वाखाली एक प्रतिनिधी मंडळ येत्या २३ व २४ रोजी भारतात येणार आहे. नवी दिल्लीत ते भारतीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत.
भारत-पाकिस्तानदरम्यान क्रिकेट मालिका येत्या डिसेंबरमध्ये संयुक्त अरब अमिरात येथे खेळविली
जाईल. मात्र, पंजाबच्या गुरुदासपूर येथे झालेल्या आतंकवादी हल्ला आणि सीमारेषेवर सुरू असलेला
संघर्ष यांमुळे ही मालिका संकटात सापडली आहे.
शेजारील देश पाकिस्तानला मात्र याबाबत आशा आहे, की २००७नंतर दोन्ही देशांत क्रिकेट मालिका आयोजित केली जाईल. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव अनुराग ठाकूर यांनी स्पष्ट केले
होते, की दहशतवाद आणि
क्रिकेट हे सोबत चालणे कठीण
आहे. ( वृत्तसंस्था)