पूजा, संगीता यांनी आत्मविश्वास दिला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 03:52 AM2018-01-20T03:52:40+5:302018-01-20T03:52:43+5:30
प्रोरेसलिंग लीगमुळे अनेक भारतीय खेळाडूंचे जीवन बदलले आहे, असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. या स्पर्धेतून मिळालेले प्रेम, अनेक अविस्मरणीय अनुभव आम्ही भविष्यात आमच्या
साक्षी मलिक (लोकमत मुंबई महारथी)
प्रोरेसलिंग लीगमुळे अनेक भारतीय खेळाडूंचे जीवन बदलले आहे, असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. या स्पर्धेतून मिळालेले
प्रेम, अनेक अविस्मरणीय अनुभव आम्ही भविष्यात आमच्या पुढील पिढीसोबत शेअर करु. मला खात्री आहे, की जे खेळाडू आज या लीगमध्ये सहभागी होऊ शकले नाही, त्यांनाही आमच्या इतकाच फायदा झाला असेल. जेव्हा या लीगमध्ये संघांची वाढेल तेव्हा नक्कीच त्यांनाही या लीगमध्ये खेळण्याची संधी मिळेल. संघ आणि मल्ल यांची संख्या वाढल्यास नक्कीच नवी संधी मिळेल आणि यामध्ये सर्वाधिक फायदा भारतीय मल्लांचा होईल, यात शंका नाही.
यंदा आतापर्यंतच्या प्रवासात माझा संघ लोकमत मुंबई महाराथी केवळ एक सामना जिंकण्यात
यशस्वी ठरला आहे. त्यामुळे आता उपांत्य सामन्यात जागा मिळवण्यासाठी आम्हाला आमच्या उर्वरीत दोन्ही सामने जिंकावे लागतील. या गोष्टीची मला
आणि माझ्या संघाला जाणीव असल्याने आमच्यावर काहीसे दडपण नक्कीच आहे. तरी, मी माझ्या संघातील सर्व खेळाडूंना याबाबत जास्त विचार न करण्याचा सल्ला दिला आहे. विजय मिळवण्यासाठी आम्हाला आमचा सर्वोत्तम खेळ करावा लागणार आहे. त्याचवेळी, जर का यंदा आम्ही उपांत्य फेरी गाठण्यात यशस्वी ठरलो नाही, तर ही माझ्यासाठी अर्धवट मोहिम राहिल आणि पुढील वर्षी मी अधिक जोमाने नव्याने तयारी करेल.
पूजा धांडा आणि संगीता फोगट यांची यंदाची कामगिरी जबरदस्त झाली असून त्यांचे कौतुक करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. पूजाने वर्ल्ड आणि आॅलिम्पिक चॅम्पियन हेलेन मारौलिस हिला नमवल्यानंतर संगीताने वेनेसा कालाद्झींस्काया या आणखी एका वर्ल्ड चॅम्पियनला पराभूत केले.
या दोन धक्कादायक विजयानंतर प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुलली. या यशामुळे या
दोघी प्रत्येकाच्या कौतुकास
पात्र आहेत. या दोन्ही लढती मी प्रत्यक्षपणे पाहिल्या आणि मला आवर्जून सांगायचे आहे की या दोघींच्या खेळाने मी मंत्रमुग्ध झाले. यावेळी मी एक थरार अनुभवला आणि आता या दोघींची मी चाहती बनली आहे.
खरं म्हणजे, या दोन्ही खेळाडूंचे मी आभार मानू इच्छिते. कारण
या दोघींमुळे मला पुढील लढतीत अनास्तासिजिया ग्रिगोरजेवाविरुद्ध लढण्याचा आत्मविश्वास मिळाला. जर ते वर्ल्ड चॅम्पियनला नमवू शकतात, तर मी देखील अशी कामगिरी करु शकते, असा
विश्वास मिळाला. माझी अखेरची लढत सरिताविरुद्ध होणार
असून तिला मी अनेकदा नमवले
आहे. त्यामुळे मी सुरुवातीपासून वर्चस्व राखू शकते असा विश्वास वाटतो.
प्रो रेसलिंगचे आतापर्यंतचे
सर्व सत्र आमच्यासाठी संस्मरणीय ठरले. पहिल्या सत्रात मी वेगळ्या संघात होते. त्यावेळी आमचे
सर्व विजय एकतर्फी होते.
प्रत्येक विजयाचा आम्ही जल्लोष केला असून प्रत्येक क्षण आम्ही
एन्जॉय केला आहे. दुसºया सत्रात आमच्या संघातील बजरंग दुखापतग्रस्त झाल्याने आम्ही दुर्दैवी ठरलो. यंदाचे सत्रही आमच्यसाठी चांगले ठरले. सध्या आम्ही स्पर्धेचा आनंद घेत असून उर्वरीत दोन्ही सामन्यात आम्ही छाप पाडू.