स्वच्छ भारत मोहिमेबरोबर सिंधू, साक्षी, दीपा जोडण्याची शक्यता
By admin | Published: September 5, 2016 05:40 AM2016-09-05T05:40:05+5:302016-09-05T05:40:05+5:30
सिंधू, साक्षी मलिक आणि दीपा करमाकर या त्रिमूर्तीची मोदी सरकारच्या ‘स्वच्छ भारत’ मोहिमेच्या ब्रँड अॅम्बेसेडरपदी निवड होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करून भारताचे नाव उंचावणाऱ्या पी. व्ही. सिंधू, साक्षी मलिक आणि दीपा करमाकर या त्रिमूर्तीची मोदी सरकारच्या ‘स्वच्छ भारत’ मोहिमेच्या ब्रँड अॅम्बेसेडरपदी निवड होण्याची शक्यता आहे.
रिओ आॅलिम्पिकमध्ये केलेल्या दिमाखदार प्रदर्शनानंतर सिंधू, साक्षी आणि दीपा घराघरांत पोहोचल्या. केंद्रीय सरकारच्या मते या तिन्ही खेळाडूंकडून भारतीय प्रेरणा घेऊ शकतात. देशाच्या या तीन मुलींकडून प्रेरणा घेऊन नागरिक स्वच्छतेबाबत जागरूक राहतील. याआधीही केंद्र सरकारने स्वच्छ भारत मोहिमेसाठी अनेक प्रतिभावंत मान्यवरांना जोडले होते. यामध्ये बिग बी अमिताभ बच्चन, योगगुरू बाबा रामदेव, माजी क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि अनिल अंबानी यांसारखे प्रसिद्ध व्यावसायिक यांचा समावेश आहे.(वृत्तसंस्था)