विराटला प्रोत्साहन देण्यासाठी अनुष्का कानपूरमध्ये येण्याची शक्यता

By Admin | Published: September 19, 2016 08:04 PM2016-09-19T20:04:53+5:302016-09-19T20:04:53+5:30

भारताच्या ५०० व्या कसोटी सामन्याच्या निमित्ताने कर्णधार विराट कोहलीला प्रोत्साहन देण्यासाठी चित्रपट अभिनेत्री अनुष्का शर्मा ग्रीन पार्कमध्ये उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे.

The possibility of Anushka coming to Kanpur to promote Virat | विराटला प्रोत्साहन देण्यासाठी अनुष्का कानपूरमध्ये येण्याची शक्यता

विराटला प्रोत्साहन देण्यासाठी अनुष्का कानपूरमध्ये येण्याची शक्यता

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
कानपूर,दि. १९ : भारताच्या ५०० व्या कसोटी सामन्याच्या निमित्ताने कर्णधार विराट कोहलीला प्रोत्साहन देण्यासाठी चित्रपट अभिनेत्री अनुष्का शर्मा ग्रीन पार्कमध्ये उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत उत्तर प्रदेश क्रिकेट संघटना (यूपीसीए), कानपूर पोलीस आणि हॉलेट व्यवस्थापनाने ठोस उत्तर देण्याचे टाळले.

सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार कोहलीला प्रोत्साहन देण्यासाठी त्याची मैत्रिण व फिल्म स्टार अनुष्का कसोटी सामन्यादरम्यान एक दिवस ग्रीन पार्कवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. याबाबत यूपीसीएचे संचालक राजीव शुक्ला यांना विचारले असता त्यांनी याबाबत माहिती नसल्याचे सांगितले. अनुष्का जर विराटला प्रोत्साहन देण्यासाठी कसोटी सामन्यादरम्यान उपस्थित राहणार असेल तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, असेही ते म्हणाले.

कानपूर पोलीसचे एसएसपी शलभ माथुर यांनी त्यांच्याकडे याबाबत कुठली माहिती नसल्याचे सांगितले. अनुष्कासाठी सुरक्षा व्यवस्थेची मागणी करण्यात आली तर कानपूर पोलीसतर्फे सुरक्षा प्रदान क रण्यात येईल.

हॉटेलचे व्यवस्थापक विकास मेहरोत्रा यांना अनुष्कासाठी भारतीय संघाच्या हॉटेलमध्ये वेगळी रुम बुक करण्यात आली आहे का, असे विचारले असता. ते म्हणाले, बीसीसीआय व यूपीसीएने १० रुम्स हॉटेलमध्ये राखीव ठेवल्या आहेत. या रुम्स कुणाला देण्यात येणार आहेत, याबाबत माहिती नाही. अनुष्कासाठी वेगळी रुम बुक करण्यात आलेली नाही

Web Title: The possibility of Anushka coming to Kanpur to promote Virat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.