हॉकी इंडियाकडून संभाव्य संघ जाहीर
By Admin | Published: March 10, 2017 11:46 PM2017-03-10T23:46:25+5:302017-03-10T23:46:25+5:30
हॉकी इंडियाने राष्ट्रीय शिबिरासाठी संभाव्य ३३ खेळाडूंची नावे शुक्रवारी जाहीर केली. बेंगळुरू येथील साई केंद्रात १४ मार्चपासून शिबिराला सुरुवात होणार आहे.
नवी दिल्ली : हॉकी इंडियाने राष्ट्रीय शिबिरासाठी संभाव्य ३३ खेळाडूंची नावे शुक्रवारी जाहीर केली. बेंगळुरू येथील साई केंद्रात १४ मार्चपासून शिबिराला सुरुवात होणार आहे. मुख्य कोच रोलॅन्ट ओल्टमन्स यांच्या मार्गदर्शनात होणाऱ्या शिबिरात ज्युनियर विश्वचषक विजेत्या संघातील ११ चेहऱ्यांचा समावेश
आहे.
नुकत्याच संपलेल्या हॉकी इंडिया लीगमध्ये ज्युनियर खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली होती. संदीपसिंग, हरजितसिंग, हरमनप्रितसिंग आणि विकास दहिया हे आधीपासून सिनियर संघात खेळले आहेत. बचावफळीतील दिप्तान तिर्की आणि गुरिंदरसिंग, मिडफिल्डर सुमित शर्मा, मनप्रित आणि सिमरणजीतसिंग, आक्रमक फळीतील गुरजांतसिंग हे नवे चेहरे आहेत.
संभाव्य संघातून एप्रिल महिन्यात आयोजित सुल्तान अझलान शाह चषक स्पर्धेसाठी तसेच जूनमध्ये आयोजित पुरुष हॉकी विश्व लीगच्या अंतिम फेरीसाठी संघ निवडला जाईल. ही स्पर्धा लंडनमध्ये होणार आहे. मुंबईचा २० वर्षांचा गोलकिपर सूरज करकेरा याला सिनियर शिबिरासाठी बोलावणे आले आहे. तो मागच्यावर्षी व्हेलेसिया येथे झालेल्या चार देशांच्या आंतरराष्ट्रीय ज्युनियर हॉकी स्पर्धेत भारतीय संघात खेळला. (वृत्तसंस्था)
राष्ट्रीय शिबिरासाठी संभाव्य हॉकीपटू
गोलकीपर : आकाश चिकटे, पीआर श्रीजेश, विकास दहिया, सूरज करकेरा बचावफळी : दिप्सान टिर्की, परदीप मोर,वीरेंद्र लाक्रा, कोथाजीतसिंग, सुरेंदर कुमार, रुपिंदरपालसिंग, हरमनप्रीतसिंग, जसजीतसिंग कुलार, गुरिंदरसिंग, अमित रोहिदास . मधली फळी : चिंगलेनसानासिंग, एसके उथप्पा, सुमित, सतबीरसिंग, सरदारसिंग, मनप्रीतसिंग, हरजीतसिंग, नीलकांत शर्मा, मनप्रीत, सिमरनजीतसिंग, आर्क : रमनदीप सिंह, एसवी सुनील, तलविंदर सिंह, मंदीप सिंह, अफ्फान यूसुफ, निक्किन थिमैया, गुरजांत सिंह, आकाशदीप सिंह, ललित उपाध्याय