फलंदाजी ‘पॉवर प्ले’ बाद!
By admin | Published: June 28, 2015 02:58 AM2015-06-28T02:58:25+5:302015-06-28T02:58:25+5:30
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) वन डे क्रिकेटमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजीत संतुलन साधण्यासाठी नियमांत दुरुस्ती केली. यानुसार फलंदाजी ‘पॉवर प्ले’ संपविण्याचा
एकदिवसीय क्रिकेटमध्ये बदल : आयसीसीने केल्या नियमात सुधारणा; ५ जुलैपासून सुरू होणाऱ्या मालिकेत अंमलबजावणी
बार्बाडोस : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) वन डे क्रिकेटमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजीत संतुलन साधण्यासाठी नियमांत दुरुस्ती केली. यानुसार फलंदाजी ‘पॉवर प्ले’ संपविण्याचा तसेच डावाच्या अखेरच्या १० षटकांत ३० यार्डाबाहेर पाच क्षेत्ररक्षक उभे करण्याची मुभा देण्याचा निर्णय घेण्यात आला.
नवे नियम ५ जुलैपासून सुरू होणाऱ्या मालिकेत लागू केले जातील, असे आयसीसीने म्हटले आहे. भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेच्या नेतृत्वाखालील समितीने सुचविलेल्या उपाययोजनांवर हा निर्णय घेण्यात आला. गोलंदाजी व फलंदाजीत संतुलन साधण्यासाठी आणि या प्रकारातील उत्साह, आक्रमकपणा कायम ठेवण्यासाठी हा बदल केल्याचे आयसीसीचे सीईओ डेव्हिड रिचर्डसन यांनी सांगितले.
नियमांत अशा केल्या सुधारणा...
१५ ते ४० या षटकांदरम्यान घ्यावा लागणारा फलंदाजी ‘पॉवर प्ले’ नसेल.
-अखेरच्या १० षटकांत ३० यार्डाबाहेर पाच खेळाडू उभे करता येणार.
-एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमधील सर्व प्रकारच्या ‘नो बॉल’वर ‘फ्री’ हिट मिळणार आहे.
-एकदिवसीय सामन्यात पहिल्या १० षटकांत दोन खेळाडूंना झेल घेण्याच्या ठिकाणी उभे करणे अनिवार्य नसेल.
क्रिकेटमधील भ्रष्टाचार संपविण्यासाठी आम्ही कठोर उपाययोजना करीत आहोत. यासाठी सर्वाेपरी उपाययोजना करण्याचा आमचा संकल्प आहे. शिफारशी लागू केल्यास खेळातील वाईट प्रवृत्तीवर चौफेर नजर ठेवणे सोपे जाईल.
- एन. श्रीनिवासन, आयसीसी चेअरमन